• Sun. Jun 7th, 2026

    ‘फेज 2’अंतर्गत पुण्यात मेट्रोचा विस्तार होणार; 22 किमी लांब डबल-डेकर उड्डाणपुलांचा समावेश, कुठे-कसे असतील मार्ग?

    ‘फेज 2’अंतर्गत पुण्यात मेट्रोचा विस्तार होणार; 22 किमी लांब डबल-डेकर उड्डाणपुलांचा समावेश, कुठे-कसे असतील मार्ग?

    Pune Metro Phase 2: शहरात ती मार्गिकांचं काम पूर्ण होत आलं असताना पुढे चार मार्ग प्रस्तावित आहेत. या मार्गांवर पुणे मेट्रोचे जाळे 100 किमी लांब होणार असून यावरती 22 किमी लांब दुमजली उड्डाणपुलांचा समावेश असेल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: शहरात मेट्रोच्या ‘फेज 1’चं काम जवळपास पूर्ण होत आलं आहे. त्यानंतर आता फेज 2 साठी हालचाली सुरू होत आहेत. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या फेझमध्ये शहरात तब्बल 55 किलोमीटर लांबीचे मार्ग प्रस्तावित आहेत. या मार्गांवर आता तब्बल 22 किलोमीटर लांब दुमजली उड्डाणपूल म्हणजेच डबल डेकर पुलांचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे पुणे शहरातील कनेक्टीव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे.

    ‘फेज 1’मध्ये कोणत्या मार्गाचा समावेश?

    पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात मेट्रो लाइन 1ची सुरूवात झाली. पीसीएमसी ते स्वारगेट 16.6 किमी लांब मेट्रोला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता या मेट्रो मार्गाचा विस्तार स्वारगेटपासून कात्रजपर्यंत करण्यात येत आहे. तसेच, पीसीएमसी ते निगडीपर्यंतही मेट्रोचा विस्तार सुरू आहे. त्याशिवाय मेट्रो लाइन 2 (अॅक्वा लाइन) शहरातील वनाझ ते रामवाडीपर्यंत धावते. या 14.7 किमी लांब मेट्रोचं काम पूर्ण झालं असून पूर्व ते पश्चिम कनेक्टीव्हीटी मिळते. फेझ 1च्या शेवटच्या टप्प्यात मेट्रो लाइन 3, हिंजवडी ते शिवजीनगर मेट्रो सुरू होणार आहे. या मेट्रो मार्गावरील 12 स्थानकांचं काम पूर्ण झालं असून ती जून महिन्यात प्रवाशांसाठी खुली होणार आहे. उर्वरित स्थानकांचं काम पूर्ण करून ऑक्टोबरपर्यंत ‘फेज 1’चा शेवटचा टप्पा पूर्ण होईल.

    पुणे मेट्रो 1

    ‘फेज 2’चा विस्तार कसा होणार?

    ‘फेज 2’मध्ये मेट्रो लाइन 2चा दोन ठिकाणी विस्तार करून मेट्रो लाइन 4 आणि 4अ उभारण्यात येणार आहे. यानंतर पुणे मेट्रो 100 किमी लांब बनेल. सर्वप्रथम मेट्रो लाइन 2अ मध्ये वनाझ ते चांदणी चौक विस्तार होणार आहे. त्यानंतर मेट्रो लाइन 2ब अंतर्गत रामवाडी ते वाघोली विस्तार करून 11 नवी स्थानकं सुरू होतील. याशिवाय 2025मध्ये पुणे मेट्रो 4ला मंजुरी मिळाली होती. खडकवासला ते खराडी जोडणारी ही मार्गिका 31 किमी लांब असून यावरती 28 स्थानकं असतील. त्यानंतर मेट्रो 4अ असा विस्तार करून नळ स्टॉप ते माणिक बाग स्थानकं बांधण्यात येतील.

    कुठे होणार डबल-डेकर पूल?

    या ‘फेज’मध्ये एकूण 55 किमी लांब विस्तार होणार असून 22 किमी लांब दुमजली उड्डाणपूलही असतील. यातील काही मार्ग सहा पदरी असतील तर काही आठ. पुण्यातील झपाट्याने वाढणाऱ्या भागांना ते जोडतील. रामवाडी ते वाघोली, वनाझ ते चांदणी चौक, खराडी ते खडकवासला, नळ स्टॉप ते माणिकबाग आणि सोलापूर मार्गावरील भैरोबा नाला ते आकाशवाणी या मार्गांचा समावेश आहे. यापैकी एक 4.8 किमी लांबीचा उड्डाणपूल रामवाडी चे वाघोली (मेट्रो लाइन 2ब) मार्गावर असेल. तसेच, त्याच मार्गावर उड्डाणपुलाखाली एक 6.8 किमी लांबीचा उन्नत मार्ग असेल. या वरती मेट्रो धावणार.

    डबल डेकर उड्डाणपूल

    वनाझ ते चांदणी चौक मार्गावर एक उन्नत मार्ग आणि चांदणी चौक मेट्रो स्थानकाला जोडणारा एक पादचारी पूल असेल. दरम्यान, खराडी ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग मार्गावरही डबल डेकर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. हे पूल संपूर्ण 33 किमी लांब मेट्रो कॉरिडोरवर असतील. सोलापूर मार्गावरील भैरोबा नाला ते आकाशवाणी मेट्रो मार्गावर असलेला डबल डेकर पूल सहा पदरी असेल.

    सध्या या प्रस्तावाच्या स्ट्रक्चरल डिझाइनची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र प्रूफ चेकिंग कन्सल्टंट (PCC)ची नियुक्ती करण्यास सुरूवात केली आहे. हे सल्लागार व्हायडक्ट्स, मेट्रो मार्ग, स्थानकं आणि उन्नत मार्गांची तपासणी करून प्रकल्पाला अंतिम मंजुरी देतील.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा