• Fri. Jun 5th, 2026

    ‘मेट्रो-११’चा वडाळा ते वांद्रे विस्तार; गरीब नगर येथील अतिक्रमणमुक्तीनंतर हालचाली, भुयारी मेट्रोने प्रवास वेगवान होणार

    ‘मेट्रो-११’चा वडाळा ते वांद्रे विस्तार; गरीब नगर येथील अतिक्रमणमुक्तीनंतर हालचाली, भुयारी मेट्रोने प्रवास वेगवान होणार

    Bandra Garib Nagar Demolition: काही महिन्यांपूर्वीच मुंबई मेट्रो 11चा वांद्रे टर्मिनसपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पश्चिम रेल्वेच्या गरीब नगर येथील कारवाईनंतर प्रशासनाने सर्वेक्षण सुरू केले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर, आता मेट्रो विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉपेरिशनतर्फे (एमएमआरसी) मुंबई मेट्रो-११च्या विस्तारित टप्प्याचे प्राथमिक भूमिगत सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्याची प्रक्रिया मेट्रो प्रशासनाने सुरू केली आहे.

    थेट गेट वेला पोहोचणे शक्य

    आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडिया अशी भूमिगत मुंबई मेट्रो-११ (हिरवी मार्गिका) आहे. या मार्गावरील सुमारे सात किमी अंतराच्या वडाळा ते वांद्रे टर्मिनस धारावीमार्गे भूमिगत मेट्रोला राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे वांद्रे टर्मिनसहून भुयारी मेट्रोने थेट गेट वेला आणि पूर्व उपनगरात पोहोचणे शक्य होणार आहे.

    Maharashtra TimesBandra Demolition: गरीब नगरमधील कारवाईचा रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा; 50 नव्या एक्सप्रेस ट्रेन, वांद्रे टर्मिनसचा कसा होणार विस्तार?

    प्रस्तावित मुंबई मेट्रो-११सह वडाळा ते वांद्रे टर्मिनस अशा दोन्ही भुयारी मेट्रो मार्गिकांचे भूमिगत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात भूमिगत विविध सुविधा तसेच संभाव्य अडथळ्यांचे नकाशे (मॅपिंग) तयार करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (जीपीआर) तंत्रज्ञानाच्या मदतीने पाच मीटर खोलीपर्यंत भूमिगत पाइपलाइन, वीजवाहिन्या, दूरसंचार केबल आणि इतर सुविधांचे नकाशे तयार करण्यात येतील. संबंधित कंपन्यांकडून माहिती गोळा करून त्याचा सविस्तर अहवाल एका महिन्यात तयार करून प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे. यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

    मार्च महिन्यात राज्य सरकारने मेट्रो-११ मार्ग वांद्रे टर्मिनसपर्यंत वाढवण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. धारावीमार्गे होणारा हा विस्तार सुमारे आठ हेक्टर क्षेत्र व्यापणार आहे. सुरुवातीला हा प्रकल्प मेट्रो-४चा विस्तार मानला जात होता. मात्र सद्यस्थितीत वडाळा ते वांद्रे टर्मिनस अशी स्वतंत्र मेट्रो मार्गिका असणार आहे.

    वांद्रे टर्मिनस ‘मल्टिमोडल हब’

    वांद्रे, गरीब नगरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर आता वांद्रे टर्मिनस विस्ताराला गती मिळणार आहे. वांद्रे टर्मिनस पुनर्विकासात थेट पश्चिम द्रुतगती मार्गाच्या जोडणीचे नियोजन आहे. अशातच आता भुयारी मेट्रोमुळे वांद्रे टर्मिनस भविष्यात ‘मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’ म्हणून विकसित होण्याचे संकेत मिळत आहेत.

    Maharashtra TimesBandra Demolition Drive : वांद्र्यात गरिबनगरमध्ये राडा, दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; पोलिसांचा मोठा इशारा

    अंदाजे खर्च २३,४८७कोटी रुपये

    राज्य सरकारने २०२६-२७च्या अर्थसंकल्पात या १६.५ किमी लांबीच्या प्रकल्पाचा अंदाजित खर्च २३,४८७ कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे. या प्रकल्पासाठी केंद्र, राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून निधी उपलब्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून ही कर्ज घेण्यास मंजूरी मिळाली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा