• Sat. Jun 6th, 2026

    अरबी समुद्रातील मोसमी वाऱ्यांवर मोठा परिणाम; मान्सून आगमनासाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे, ‘स्कायमेट’चा अंदाज

    अरबी समुद्रातील मोसमी वाऱ्यांवर मोठा परिणाम; मान्सून आगमनासाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे, ‘स्कायमेट’चा अंदाज

    Monsoon Prediction: भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन लवकर होणार असल्याची माहिती दिली असताना स्कायमेटने अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: हवामान जगभरातील काही मॉडेलनुसार, आज, शुक्रवार आणि उद्या, शनिवार या दोन दिवसांमध्ये दक्षिण-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र तीव्र झाल्यानंतर ते किनारपट्टीपासून दूर जाण्याची शक्यता आहे. मात्र हे क्षेत्र तात्पुरत्या स्वरूपात आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ किनारपट्टीवरील अपेक्षित मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करू शकते. त्यामुळे देशातील मान्सून आगमनावर परिणाम होऊ शकतो. हवामान अभ्यासक तसेच खासगी हवामान संस्थांनी याकडे लक्ष वेधले आहे.

    अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत?

    दक्षिण-मध्य अरबी समुद्रावर शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. हवेच्या खालच्या स्तरामध्ये दक्षिण-मध्य भागापासून लक्षद्वीपपर्यंत पूर्व-पश्चिम दिशेने विस्तारलेला द्रोणीय पट्टा आहे. शुक्रवारपर्यंत या प्रदेशावर चक्रीय वातस्थिती निर्माण होण्याची आणि नंतर एक दिवसात ते कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने दिली. या प्रणालीच्या निर्मितीबाबत मतभिन्नता आहे. अनेकदा अशा कमी दाबाच्या प्रणाली तीव्र झाल्यावर किनाऱ्यापासून दूर जातात, अरबी समुद्रावरील वाऱ्यांवरही परिणाम करतात.

    Maharashtra TimesNautapa: 9 दिवस घरातून बाहरे पडणं कठीण होणार; सूर्य आग ओकणार, उष्णतेच्या तीव्र लाटा येणार, ‘नवतपा’ कधी सुरू होणार?

    काही वेळा आर्द्रताही खेचून घेतात. यामुळे लक्षद्वीप बेटे, आग्नेय अरबी समुद्र, मालदीव प्रदेश तसेच केरळ व कर्नाटकच्या किनाऱ्यालगत पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. परिणामी मोसमी पावसाच्या आगमनास विलंब होऊ शकतो. मात्र, अचूक अंदाजासाठी ४८ तास कडक निरीक्षण आवश्यक आहे.

    भारतीय हवामान विभागाने मात्र कमी दाबाच्या क्षेत्राचा अंदाज अद्याप वर्तवता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे २६ मे हा केरळमधील मान्सून आगमनाचा अंदाज कायम ठेवला आहे. २१ ते २७ मेदरम्यान आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग, आग्नेय आणि नैर्ऋत्य बंगालचा उपसागर येथे मान्सूनची प्रगती होऊ शकते.

    Maharashtra TimesEl Nino: अनेक वर्षांनंतर भारतात ‘सुपर एल निनो’; उष्णतेच्या तीव्र लाटा अन् दुष्काळ, हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती समोर

    दिल्लीत उष्णतेची लाट कायम

    दिल्ली-एनसीआरसह देशभरातील आठ राज्यांमध्ये आलेली तीव्र उष्णतेची लाट आणखी आठवडाभर कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या उष्णतेच्या लाटेचा नकाशा पाहता जवळपास संपूर्ण देश तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात आहे. देशाचा बहुतांश भाग रेड झोनमध्ये असून उष्णतेच्या लाटेची तीव्रता झपाट्याने वाढत आहे. या वातावरणात उष्माघाताची वाढती शक्यता लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना सावधानतेचा सल्ला दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा