Supreme Court News: न्यायालयात करण्यात आलेल्या टिपण्णीवर नाराजी व्यक्त करताना स्थापन करण्यात आलेल्या कॉकरोच जनता पार्टीने आपला अजेंडाही जाहीर केला आहे.
कोर्टाने झुरळ संबोधलं, बेरोजगार GenZ कडून त्याच नावाने राजकीय पक्षाची घोषणा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी काही दिवसांपूर्वी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान काही बेरोजगार तरुणांना झुरळांची उपमा दिल्यामुळे देशभरात याबाबतची चर्चा रंगली. ‘रोजगार किंवा व्यावसायिक स्थैर्य नसलेले काही तरुण पुढे जाऊन सोशल मीडिया, मीडिया किंवा माहिती अधिकार कार्यकर्ता अशा माध्यमातून व्यवस्थेवर हल्ले करू लागतात,’ असं निरीक्षण सरन्यायाधीश यांनी नोंदवलं होतं. त्यांनी बेरोजगार तरुणांना झुरळांची उपमा दिल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अशातच महाराष्ट्रातील एका तरुणाने यावर उपहासात्मक कृती करत थेट ” कॉकरोच जनता पार्टी ” या नावाने पक्षाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे या राजकीय पक्षाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून इन्स्टाग्रामवर अवघ्या काही तासांत या पक्षाचे ५० लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले असून लाखो तरुणांनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही या पक्षाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
अभिजीत दीपके या तरुणाने “कॉकरोच जनता पार्टी”ची स्थापना केली आहे. हा पक्ष जॉइन करण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. आमचा पक्ष जॉइन करण्यासाठी तुम्ही बेरोजगार, आळशी, सतत ऑनलाइन असणारे आणि योग्य मार्गाने संताप व्यक्त करण्याची क्षमता असणारे असायला हवात, असं या इन्स्टाग्राम पेजवरून स्पष्ट करण्यात आलं आहे.
देशात रोजगाराबाबतचे संकट गडद होत असताना व्यवस्थेकडून थट्टा उडवली जात असल्याचं म्हणत तरुणांकडून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून हा संताप व्यक्त करण्यासाठी तरुणांनी “कॉकरोच जनता पार्टी”च्या माध्यमातून उपहासात्मक पर्यायाचा अवलंब करण्याचं ठरवल्याचं दिसत आहे. या राजकीय पक्षाच्या नावाने एक वेबसाइटदेखील तयार करण्यात आली असून या वेबसाइटवर पक्षाची ध्येयधोरणे, उद्दिष्टये आणि प्रवेशाच्या अटींबाबत माहिती देण्यात आली आहे.
“कॉकरोच जनता पार्टी”चा अजेंडा काय?
१. निवृत्त न्यायाधीशांना कोणतेही बक्षीस नाही
२. प्रत्येक मताचं संरक्षण
३. स्वायत्त प्रसारमाध्यमे
४. महिलांना ५० टक्के आरक्षण
५. पक्षांतर केल्यास निवडणूक लढवण्यास २० वर्षांची बंदी
अभिजीत दीपके नेमका कोण?
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके हा तरुण एक राजकीय रणनीतीकार आहे. त्याने पुण्यात पत्रकारितेतून पदवीचे शिक्षण घेतलं आणि नंतर उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला आहे. तो सध्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये जनसंपर्क (पब्लिक रिलेशन्स) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. २०२० ते २०२३ पर्यंत, त्याने आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये काम केलं असून फेब्रुवारी २०२० मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ने जिंकलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान त्याने मीम-आधारित डिजिटल प्रचारावर काम केले होते.
सरन्यायाधीशांनी काय स्पष्टीकरण दिलंय?
बेरोजगार तरुणांवरील टिपण्णीवरून वादंग निर्माण झाल्यानंतर सरन्यायाधीस सूर्य कांत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मी देशाच्या तरुणांवर टीका केली नसून बोगस व बनावट पदव्या घेत वकिली, मीडिया किंवा इतर क्षेत्रात घुसलेल्या आणि व्यवस्थेला बदनाम करणाऱ्यांवर टीका केली होती. भारताचा प्रत्येक तरुण मला प्रेरित करतो व हे सर्व तरुण विकसित भारताचे आधारस्तंभ आहेत,” असं सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा