Sharad Pawar On PM Modi: ‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ज्याप्रमाणे जनतेची प्रतिष्ठा जपली, त्याचप्रमाणे नरेंद्र मोदीही भारताबाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचे काम करत आहेत’, अशी पुस्ती त्यांनी जोडली. पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी-शप पक्षाला मात्र बुधवारी स्पष्टीकरण द्यावे लागले.
मंगळवारी सायंकाळी सीएसएमटी येथील लक्ष्मणराव गुट्टे रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनद्वारा माजी प्रदेश पदाधिकारी व जिल्हा पदाधिकाऱ्यांचा कृतज्ञता आणि स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्या रशिया भेटीला गेल्या. इंदरकुमार गुजराल हे रशियात भारताचे राजदूत होते. साधारणतः एखाद्या देशाचा पंतप्रधान तुमच्याकडे आल्यानंतर त्या दर्जाच्याच देशातील नेत्याने त्यांचे स्वागत करायचा प्रघात असतो.
Land Record Department: जमीन मोजणी, गावठाण नोंदी, नगर भूमापनासाठी सरकारचा मोठा प्लॅन; 50 नवी कार्यालयं, 10 हजार पदांवरही मोहर
गांधी मॉस्कोला उतरल्या, परंतु, त्यांचे स्वागत करायला रशियाचा वरिष्ठ नेता आला नव्हता. त्यावेळी गांधी अस्वस्थ दिसल्या. त्यानंतर गांधी थेट भारतीय दूतावासात गेल्या. दूतावासात राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मुलांसोबत त्या खेळू लागल्या. रशियाचे राष्ट्रप्रमुख हे गांधींच्या स्वागतासाठी दुसऱ्या ठिकाणी थांबले होते. तयावेळी राष्ट्रप्रमुख स्वतः दूतावासात गेले आणि इंदिरा गांधी यांची त्यांनी माफी मागितली. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी, हा आपल्या माफीचा प्रश्न नाही तर ज्या ४० कोटी जनतेचे प्रतिनिधित्व मी करते, त्यांची अप्रतिष्ठा मी कधीही मान्य करणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली’, असे पवार म्हणाले.
‘पवारांची भूमिका महत्त्वाची’
‘शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे. अनेक जण पंतप्रधान परदेशात का गेले, तिथे काय केले अशी टीका करत होते. त्यावेळी विविध देशांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महत्त्वाचे करार करत होते. त्यामुळे पुढच्या १५ ते २० वर्षांचे आपले भवितव्य सुरक्षित झाले. म्हणून शरद पवार म्हणाले की विनाकारण टीका करू नका’, असे फडणवीस म्हणाले.
Bandra Demolition Drive : वांद्र्यात गरिबनगरमध्ये राडा, दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; पोलिसांचा मोठा इशारा
विलीनीकरणावर यापुढे चर्चा नाही !
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाचा विषय संपलेला आहे. यापुढे यावर कुठलीही चर्चा होणार नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाकडून बुधवारी देण्यात आले. महाविकास आघाडी १५ ऑगस्टनंतर राज्यव्यापी दौरे करणार आहे. जनतेच्या माध्यमातून उठाव करून सरकारविरोधात आंदोलन केले जाणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची (शप) संघटनात्मक बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांकडून पवार यांच्यापुढे विलीनीकरणाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
