Ashok Kharat Case: खरातविरुद्धचा खटला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट (पीएमएलए) २००२ अंतर्गत नियुक्त विशेष सत्र न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाने खरातची ‘ईडी‘ कोठडी मंजूर केली आहे.
भोंदू अशोक खरात विरुद्ध अत्याचाराचे आठ, फसवणूक, खासगी सावकारीसह विविध कलमांतर्गत तब्बल १८ गुन्हे नोंद आहेत. एसआयटीने नऊ गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून नाशिक सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तर, सिन्नर पोलिसांनी दोन गुन्ह्यांत खरातची कोठडी पूर्ण केल्यानंतर ‘ईडी’ने त्याचा ताबा घेतला.
Nashik Shiv Sena : बैठकीच्या नावाखाली तेल आणि किराण्याचे डबे मागवून पार्टी, शिवसेना महिला पदाधिकाऱ्याचा गौप्यस्फोट; मंत्र्यांनी टोचले कान
खरातला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून मंगळवारी (दि. १९) सशस्त्र पोलिस बंदोबस्तात मुंबई येथील ‘पीएमएलए’ न्यायालयात नेण्यात आले.
‘ईडी’च्या तपासातून…
साठ बनावट बँक खाती : संशयित खरातने अहिल्यानगरमधील राहाता येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेत विविध व्यक्तींच्या आणि भाविकांच्या संमतीशिवाय त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून ६० बँक खाती उघडली. या सर्व खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर जोडलेला होता. सर्व खात्यांमध्ये तो स्वतःच एकमेव वारसदार होता. २५ मे २०२१ रोजी त्याने एकाच दिवसात ४३ खाती उघडली होती.
दुर्दैवी! बंधाऱ्यात बुडून महिलेसह तीन चिमुकल्यांचा मृत्यू; नांदूरशिंगोटेत मजूर कुटुंबावर शोककळा
सत्तर कोटींहून अधिकचे व्यवहार : खरातने पतसंस्थेच्या खात्यांमधून ७० कोटींपेक्षा जास्त व्यवहारांची उलाढाल केली आहे. त्यामध्ये ३५.५३ कोटी जमा केल्याचे आणि ३५.२१ कोटी काढल्याचे व्यवहार आहेत. तसेच ९.२३ कोटींची रोख रक्कम भरली आहे.
अध्यक्षपदाचा गैरवापर : सन २००७ ते २०१२ दरम्यान खरात ‘श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित’चा उपाध्यक्ष आणि २०२२ ते २०२४ दरम्यान अध्यक्ष होता. या पदाचा वापर करून त्याने ३४ बेनामी मुदतठेवी आणि चालू खाती उघडली. तसेच ‘केवायसी’ शिवाय किंवा कागदपत्रे न ठेवत ती खाती बंद करून कोट्यवधी रुपये रोखीने काढून घेतले.
मालमत्ता खरेदी : खंडणी आणि फसवणुकीतून मिळालेला पैसा खरातने स्वतःच्या आणि नातेवाइकांच्या नावावर ‘रिअल इस्टेट’ व विविध जंगम-स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवला.
Nashik News: २९ वर्षीय तरुणीने इमारतीवरून झोकून दिलं; उच्चशिक्षित मुलीच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का
‘ईडी’ कोठडी कशासाठी ?
-गुन्ह्यातील पैशांचा माग काढण्यासाठी संशयिताची चौकशी अत्यंत आवश्यक
-पैशांची एकूण व्याप्ती आणि त्याचे झालेले ‘लेअरिंग’ शोधणे
-गुन्ह्यात सामील असलेले इतर अंतिम लाभार्थी कोण आहेत, हे शोधणे
-या गुन्ह्याला ‘इंटरनॅशनल /क्रॉस-बॉर्डर’ (परदेशी) पैलू असण्याची दाट शक्यता असून, पैसा भारताबाहेर पाठवला गेला आहे का, याचा तपास करणे
-‘पीएमएलए’च्या कलन ५० अंतर्गत इतर साक्षीदारांचे घेतलेले जबाब व जप्त केलेल्या कागदपत्रांसोबत संशयिताची समोरासमोर बसवून चौकशी करणे
