• Sun. Jun 14th, 2026
    कोकणवासियांचा प्रवास महागणार; मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्याआधीच टोलनाके उभे, 4 वेळा टोलवसुली

    Mumbai-Goa Highway Toll Collection: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच प्रवाशांकडून टोलवसुली सुरू केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. वृत्तसेवा, अलिबाग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील काम अपूर्ण असताना रायगड जिल्ह्यातील खारपाडा येथे होणाऱ्या टोलवसुलीला नागरिकांकडून कडाडून विरोध होत आहे. त्यातच नागोठणेच्या पुढे खांब येथे दुसरा टोलनाका उभारण्यात आला आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि कोकणवासी संतप्त झाले आहेत.

    वाहतूक क्षेत्रात नाराजी व्यक्त

    रायगड जिल्ह्यात खारपाडा, खांब व पोलादपूरजवळील लोहारे या तीन ठिकाणी टोलवसुली करण्याचे नियोजन आहे. खारपाडा येथे टोलवसुली सुरू झाली आहे. याबाबतचे कंत्राट तीन महिन्यांचे आहे. त्याला नागरिकांकडून विरोध होत असतानाच खांब येथेही टोलनाका उभारण्यात आला आहे. खारपाडा येथील टोलनाक्याचा अंदाज घेऊन खांब येथे टोलवसुली करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. हा टोलनाका सुरू झाल्यानंतर लोहारे येथे टोलनाक्याची उभारणी करण्यात येणार आहे. या टोलनाक्यांमुळे मुंबई-गोवा प्रवास अधिक खर्चिक होणार आहे. यामुळे कोकणवासीयांसोबतच वाहतूक क्षेत्रात नाराजीचा सूर आहे. जीवनावश्यक वस्तूंबरोबर बाजारपेठांतील इतर वस्तूंवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.Maharashtra TimesVidarbha Highways: विदर्भातील प्रवास सुस्साट होणार! 547 किमी लांबीच्या चार महामार्गांना मंजुरी; कसे-कुठे असतील मार्ग?

    मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचेे काम अपूर्ण असताना खारपाडा टोल सुरू झाल्यावर यातून स्थानिकांना वगळण्यात येणार असल्याचे सांगण्यात आहे. तशी अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही. सरकारमधील घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनीही याबाबत मौन बाळगल्याची टीका होत आहे. खारघर टोलविरुद्ध ठोस आणि आक्रमक भूमिका घेण्यात आली, तशी भूमिका या टोलबाबत घेतली जात नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या महामार्गाचे त्याचे अधिकृत उद्घाटन होईपर्यंत खारपाडा येथील टोलवसुली तत्काळ थांबवावी, अशी मागणी रायगड प्रेस क्लबने केली आहे. २१ मे रोजी खारपाडा टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा रायगड प्रेस क्लबने दिला आहे.

    १४५ किमीचे अंतर कापताना…

    • पळस्पे फाटा ते पोलादपूर या सुमारे १४५ किलोमीटरच्या अंतरामध्ये कोकणवासी भरडला जाणार
    • खारपाडा येथे ९५ रुपये टोल दिल्यानंतर पुढे ५२ किलोमीटर अंतरावर खांब येथे दुसरा टोल द्यावा लागणार
    • पुढे ७३ किलोमीटर अंतरावर लोहारे (पोलादपूर) येथे तिसरा टोलनाका उभारण्याचे नियोजन
    • त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात टोलवसुली केली जाणार

    Maharashtra TimesMumbai News: मान्सूनसाठी ‘एमएमआरडीए’ सज्ज! मेट्रो मार्ग आणि रस्त्यांवर विविध पायाभूत सुविधा; कसा होणार फायदा?
    दरम्यान, येत्या जून महिन्यापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिली आहे. गेल्या 15 वर्षांपासून या 4 पदरी महामार्गाचं काम रखडलं आहे. त्यापैकी नागोठाणे आणि कोलाड येथील उड्डाणपूल, सुकेली घाट, मानगाव आणि इंदापूर जवळील रस्त्यांची कामं अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दररोज वाहतूक कोंडी आणि धुळीतून प्रवास करावा लागतो.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा