NEET Exam News: देशातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये विषयतज्ज्ञ म्हणून चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांना नीट परीक्षेच्या कामकाजासाठी नेमण्यात येते.
नीट पेपरफुटी प्रकरण(फोटो– IANS)
हर्ष दुधे, पुणे: राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) नेमलेल्या काही ‘अनुभवी तज्ज्ञांनी’ नीट परीक्षेतील प्रश्न लहान चिठ्ठ्यांच्या माध्यमातून संस्थेच्या मुख्य कार्यालयातून बाहेर आणल्याची शक्यता एनटीएसाठी काम केलेल्या तज्ज्ञ मंडळींनी वर्तविली आहे. यातील काही अनुभवी तज्ज्ञ हे नीट परीक्षा सुरू झाल्यापासून, एनटीएशी तज्ज्ञ म्हणून संलग्न आहेत. त्यामुळे ते कामकाजात सरावले असून, त्यांना संपूर्ण प्रक्रियेची माहिती आहे. याचा फायदा उचलत त्यांनी थेट परीक्षेत येणारे प्रश्नच गोपनीय स्वरूपात बाहेर काढले असून, त्यातीलच बहुसंख्य प्रश्न परीक्षेत आले आहेत, अशी माहिती या तज्ज्ञांनी नाव न सांगण्याच्या माहितीवर दिली.
एनटीएकडून नीट, जेईई सारख्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, विषयनिहाय प्रश्न काढणे, प्रश्नांचा अनुवाद करून प्रादेशिक भाषांमध्ये प्रश्नपत्रिका तयार करणे अशा विविध कामांसाठी एनटीएला विषयतज्ज्ञांची गरज असते. यासाठी एनटीए ‘रेफरन्स’ प्रणालीवर काम करते. देशात विषयतज्ज्ञ म्हणून ज्युनिअर कॉलेजांमध्ये उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांना परीक्षेच्या कामकाजासाठी नेमले जाते.
या शिक्षकांचा रेफरन्स अनुभवी शिक्षकांकडून दिला जातो. त्यानंतर एनटीएकडून शिक्षकांना विषयतज्ज्ञ म्हणून काम करण्याची संधी दिली जाते. त्याबाबतचा एक गोपनीय ईमेल पाठविण्यात येतो आणि त्यामध्ये गोयनीय कामासाठी विषयतज्ज्ञ म्हणून नेमणूक केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर एनटीएने सांगितलेल्या दिवशी दिल्लीतील मुख्य कार्यालयात जाऊन परीक्षेच्या संबंधित काम करायचे असते, असे त्यासाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.
दरम्यान, एनटीएसाठी काही शिक्षक नीट परीक्षा सुरू झाल्यापासून कार्यरत असून या शिक्षकांना एनटीएची जवळपास पूर्ण कार्यप्रणाली माहिती असते. त्यामुळे विषयतज्ज्ञांनी प्रश्न दिल्यानंतर, ते एनटीएकडून स्वीकारण्यात येतात. त्याचप्रमाणे हे प्रश्न विविध प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित झाल्यानंतर, ते परीक्षेत येण्याची शक्यता वाढते. अनुभवी तज्ज्ञविषय शिक्षकांकडून असेच प्रश्न हेरून बाहेर आणले जातात. या अनुभवी तज्ज्ञांच्या कामाचे मानधन काही लाख रूपयांचे आहे. यातील काहींनी प्रश्नांची देवाणघेवाण करून प्रश्न वितरीत केल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा