• Fri. Jun 5th, 2026
    Weather Alert: केरळमध्ये लवकरच मान्सून धडकणार; मुंबईमध्ये कसं राहणार हवामान? IMD कडून महत्त्वाची माहिती

    Monsoon Updates: सध्या केरळमधील अनेक भागांत पाऊस सुरू असून, हवामान विभागाने कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’, तर त्रिशूर आणि पलक्कड वगळता दहा जिल्ह्यांसाठी यलो ॲलर्ट जारी केला आहे. मंगळवारसाठी नऊ जिल्ह्यांना यलो ॲलर्ट देण्यात आला आहे.

    kerala monsoon 2026(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: येत्या आठवडाभरात केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात आणि मुंबईत मान्सून कधी येणार, याकडे मुंबईकरांची नजर लागली आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाड्याचे प्रमाण मुंबईत वाढले आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणात सध्या कमाल तापमानाचा पारा नियंत्रणात आहे. मुंबईत सोमवारी कुलाबा येथील कमाल तापमान सांताक्रूझपेक्षा एका अंशाने अधिक होते. उर्वरित महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा ४० अंश किंवा त्याहून अधिक आहे.

    सांताक्रूझ येथे सोमवारी ३४.१ तर कुलाबा येथे ३५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाब्यापेक्षा सांताक्रूझ येथे वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने सांताक्रूझ येथे तापमान कुलाब्यापेक्षा कमी नोंदले गेले, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभाग अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. सर्वसाधारणपणे कुलाबा येथे सांताक्रूझ केंद्राच्या तुलनेत कमाल तापमान कमी असते. कुलाबा येथील सोमवारचे तापमान सरासरीहून १.१ अंशांनी अधिक होते. मुंबईत अजूनही मान्सूनपूर्व सरींनी उपस्थिती लावलेली नाही.

    शुक्रवारपर्यंत मुंबईमध्ये कोरड्या वातावरणाचा अंदाज आहे. तर २० ते २४ मे या कालावधीत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, अशीही शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथेही पारा चढा असून सरासरीपेक्षा २.५ अंशांहून अधिक कमाल तापमान नोंदवले गेले. महाबळेश्वर येथे ३२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबई आणि महाबळेश्वरच्या कमाल तापमानात सध्या दोन ते तीन अंशांचाच केवळ फरक आहे. कोल्हापूर आणि नाशिक येथे सध्या मुंबईहून अधिक कमाल तापमान असून कोल्हापूर येथे ३७.५ तर नाशिक येथे ३९.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.

    केरळमध्ये २६ मे रोजी मान्सूनचे आगमन शक्य

    केरळमध्ये मान्सून यंदा २६ मेच्या सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे,’ असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तवला. मान्सूनच्या आगमनाची ही तारीख चार दिवस मागे-पुढे होऊ शकते, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

    दरम्यान, दक्षिण किनारी आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागावर निर्माण झालेल्या चक्रीय चक्रवातामुळे पुढील पाच दिवसांत केरळ आणि माहेच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या हवामानप्रणालीमुळे केरळ, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा आणि दक्षिण लक्षद्वीपला लागून असलेल्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे.

    हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने आग्नेय अरबी समुद्राचा मोठा भाग, कन्याकुमारीचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर आगेकूच केली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा