पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत आणि काटकसरीच्या आवाहनानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची शैली बदलताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी खाजगी विमानाऐवजी एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने प्रवास केला, तर सुनेत्रा पवार यांनी इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचत आणि काटकसरीच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता राज्यातील सत्ताधारी नेत्यांचाही प्रतिसाद हा प्रत्यक्ष कृतीतून दिसू लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही खाजगी विमानाऐवजी एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने दिल्ली दौरा करत चर्चेत आले आहेत. त्याचवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केल्याने राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडून ‘काटकसरीचा संदेश’ दिला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एकनाथ शिंदेंचा प्रवासी विमानाने दिल्ली दौरा
केंद्रीय नगरविकास विभागाच्या वतीने दिल्लीत आयोजित स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० आढावा बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला रवाना झाले. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे खाजगी विमानाचा वापर न करता एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने प्रवास केला. मुंबई विमानतळावर अनेक प्रवाशांनी त्यांच्यासोबत फोटो काढले, तर काहींनी निवेदनही दिली. सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे विमानतळावरील प्रक्रियेत सहभागी झाल्याने शिंदे यांच्या या दौऱ्याची चर्चा सुरू झाली.
मोदींच्या आवाहनानंतर बदलली शैली
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि संभाव्य आर्थिक ताण लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी इंधन बचत आणि काटकसरीचे आवाहन केले होते. त्यानंतर राज्य सरकार पातळीवरही हालचाली वाढल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. स्वतः फडणवीस यांनी काही दौऱ्यांसाठी इकॉनॉमी फ्लाइटने प्रवास केला होता. तसेच मंत्रालयात जाताना बाईकचा वापर केल्याने त्याचीही मोठी चर्चा झाली होती.
Pune crime: पुण्यात माणुसकी ओशाळली! प्रवासी भरण्याचा वाद विकोपाला, रिक्षाचालकाला बेदम मारलं, पुलावरुन फेकलं, तिघे ताब्यात
सुनेत्रा पवार इलेक्ट्रिक कारमध्ये
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पर्यावरणपूरक आणि इंधन बचतीच्या दृष्टीने इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख नेते आता प्रत्यक्ष कृतीतून ‘इंधन बचत’ आणि ‘काटकसर’ याचा संदेश देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
ताफ्यातील वाहनांमध्येही कपात
याशिवाय, एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्याही कमी केली आहे. तसेच हेलिकॉप्टर दौरे मर्यादित ठेवण्यावर भर दिला जात आहे. ईव्ही वाहनांचा वापर वाढवण्याबरोबरच सरकारी खर्चात बचत करण्याचा प्रयत्न राज्य सरकार पातळीवर सुरू असल्याची चर्चा आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा