NEET Paper leak latur: पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये CBIचा तपास अधिक तीव्र झाला असून बालरोगतज्ज्ञ डॉक्टरच्या घरी तीन तास कसून चौकशी करण्यात आली. प्राध्यापक आणि क्लासेसनंतर आता डॉक्टरपर्यंत तपास पोहोचल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये याआधी दोन लोकांना सीबीआयकडून ताब्यात घेण्यात आले आहे. आज सीबीआयच्या पथकाने दिवसभर प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या खाजगी शिकवणीवर कागदपत्रांची तपासणी सुरू ठेवली होती. यानंतर सायंकाळी लातूर शहरातील औसा रोड परिसरातील एका बालरोगतज्ज्ञ डॉक्टरच्या घरी सीबीआयचे पथक चौकशीसाठी दाखल झाले आहे. मागील तीन तासापासून डॉक्टरची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर येते आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बालरोग तज्ञ डॉक्टरांची मुलगी यावर्षी नीटची परीक्षा देणार होती. आता सध्या याप्रकरणी सीबीआयकडून तपासणी केली जात आहे.
परीक्षेआधीच पेपर आधीच मिळाल्याच्या संशयातून चौकशी
नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर शहरातील रसायनशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी आणि यानंतर आरसीसी या खाजगी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यावर झालेल्या सीबीआयच्या कारवाईनंतर लातूर शहरातील काही डॉक्टरांची नावे चर्चेत आली होती. या डॉक्टरांनी आपल्या पाल्यासाठी पेपर विकत घेतल्याच्या चर्चा कानावर येत होत्या. याच अनुषंगाने लातूर शहरातील औसा रोड परिसरात एका बालरोग तज्ञ डॉक्टरांवर सीबीआयची धाड पडली आहे. मागील तीन तासापासून सीबीआयच्या पथकाकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान, सीबीआय मागील सहा दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून आहे.Ahilyanagar News: गाड्या बाजूला ठेवल्या, कॅन, ड्रम भरले! पेट्रोल-डिझेल टंचाईची भीती, इंधन साठवण्यासाठी पंपावर नंबर लागले
शिवराजला ९ दिवसांची सीबीआय कोठडी
दरम्यान, काल शिवराज मोटेगावकर याला दिल्ली येथील विशेष न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर त्याला कोर्टाने ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शिवराज मोटेगावकर याच्याविरोधात अनेक पुरावे असल्याचा दावा सीबीआयने न्यायालयापुढे केला. त्यानंतर न्यायालयाने ही कोठडी मंजूर केली आहेत. मोटेगावकरने त्याच्या मोबाईलमधील पुरावे डिलिट केल्याचा मोठा ठपका हा सीबीआयने ठेवला आहे. त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधील डिलिट झालेला डेटा हा रिकव्हर करण्यात सीबीआयला यश मिळाल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यांच्या ९ दिवसांच्या कोठडीतून आता पुढे कोणते धागे समोर येतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, लातूरमधीलच आणखी एका डॉक्टरच्या घरीही चौकशी सुरु झाल्याने याप्रकरणातील पुढील साखळी नेमकी काय? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा