• Sat. Jun 13th, 2026
    Shivraj Motegaonkar: 23 एप्रिललाच मोटेगावकरकडे होता नीटाचा पेपर! CBI तपासात कोणते मिळाले पुरावे?

    NEET पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना CBIने अटक केली आहे. परीक्षेच्या १० दिवस आधीच प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा संशय व्यक्त होत असून मोबाईलमधील डिलीट डेटा रिकव्हर केल्याची माहिती समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : NEET पेपरप्रकरणात नाशिक, पुण्यानंतर आता लातूरमधील धागेदोरे अधिक मजबूत होताना दिसत आहेत. लातूरमधील प्रसिद्ध RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना CBIने अटक केली असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास वेगात सुरू आहे. विशेष म्हणजे परीक्षेच्या तब्बल दहा दिवस आधीच म्हणजे २३ एप्रिल रोजी मोटेगावकर यांच्याकडे प्रश्नपत्रिका पोहोचल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

    RCC क्लासेसच्या कार्यालयात तपास

    NEET परीक्षा यंदा रद्द करण्यात आली असून आता २१ जून रोजी नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे. दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात CBIने आक्रमक तपास सुरू केला आहे. पुणे पोलिसांनी तब्बल ११ तास चौकशी केल्यानंतर शिवराज मोटेगावकर यांना अटक करण्यात आली. CBIचे पथक सध्या लातूरमधील RCC क्लासेसच्या कार्यालयात तपास करत आहे. या कारवाईबाबत मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळली जात असून स्थानिक पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे पुरावे आणि धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची चर्चा आहे.

    मोटेगावकरांना अटक करण्याची कारणे

    तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर हे पेपरफोडी रॅकेटमधील सक्रिय सदस्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ३ मे रोजी होणाऱ्या परीक्षेचे प्रश्न त्यांच्याकडे २३ एप्रिललाच पोहोचले होते. त्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरांची माहिती सापडल्याचेही तपासातून समोर आले आहे. CBIने तपास सुरू केल्यानंतर मोबाईलमधील संबंधित डेटा डिलीट करण्यात आल्याचा आरोप आहे.

    Maharashtra TimesFarmer News: महाराष्ट्रातील २० वर्षीय पठ्ठ्याची कमाल! शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शोधला अनोखा पर्याय, CM नेही केलं कौतुक

    मात्र फॉरेन्सिक तपासातून तो डेटा पुन्हा रिकव्हर करण्यात तपास यंत्रणांना यश आल्याची माहिती समोर येत आहे. मोटेगावकर यांनी फुटलेला पेपर अनेक विद्यार्थ्यांना आणि संबंधित व्यक्तींना पुरवल्याचा संशय असून त्यामध्ये विवेक पाटील याचे नावही समोर आले आहे.

    लाखोंच्या पगारांवर शिक्षकांची नियुक्ती?

    दरम्यान, लातूरच्या कोचिंग संस्कृतीत RCC पॅटर्न मोठे नाव मानले जाते. लातूरसह नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, हडपसर, अकोला, कोल्हापूर आणि नाशिकपर्यंत या नेटवर्कचा विस्तार आहे. NEET आणि JEE परीक्षांच्या तयारीसाठी देशभरातील शिक्षक येथे नियुक्त करण्यात येतात. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणा येथूनही मोठ्या प्रमाणावर शिक्षक अध्यापनासाठी येत असल्याची माहिती आहे. काही शिक्षकांना लाखोंच्या पगारावर नियुक्त करण्यात आल्याचीही चर्चा आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा