• Sun. Jun 14th, 2026

    Kolhapur News: नादखुळा! हौशी सासऱ्याने जावयासाठी बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल, किंमतीचा आकडाही समोर

    Kolhapur News: नादखुळा! हौशी सासऱ्याने जावयासाठी बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल, किंमतीचा आकडाही समोर

    Kolhapuri Chappal: साध्या भेटींपेक्षा हटके आणि लक्षवेधी काहीतरी देण्याचा विचार करत हा नवा पर्याय निवडण्यात आला.

    हौशी सासऱ्याने जावयासाठी बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कोल्हापूर: लग्नसराईच्या धामधुमीत आणि अधिक मासाच्या निमित्ताने कोल्हापूर-सांगली पट्ट्यातील परंपरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सांगलीतील एका ग्राहकाने आपल्या जावयासाठी तब्बल दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून घेतली असून, ही अनोखी कलाकृती कोल्हापुरातील कारागिर विक्रांत माळी यांनी आठ दिवसांच्या मेहनतीनंतर तयार केली आहे. सुमारे चार लाख रुपये किंमत असलेल्या या चप्पलीची सध्या परिसरात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

    पारंपरिक भेटीला नवी झळाळी
    महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जावयाला खास भेट देण्याची परंपरा जुनी आहे. विशेषतः धोंड्याच्या महिन्यात जावयासाठी साडी, दागिने, कपडे किंवा इतर भेटवस्तू देण्याची प्रथा अनेक कुटुंबांत पाळली जाते. याच परंपरेला वेगळे वळण देत या कुटुंबाने चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवण्याचा निर्णय घेतला.

    आठ दिवसांची मेहनत

    ही चांदीची चप्पल तयार करण्याचे काम सांगलीतील ग्राहकाकडून पुढे कोल्हापुरातील विक्रांत माळी यांच्याकडे देण्यात आले. माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय बारकाईने काम करून पारंपरिक कोल्हापुरी चप्पलचा आकार, रचना आणि नक्षी तशीच जपली. प्रत्यक्षात पाहिल्यावर ती चांदीची आहे हे लगेच लक्षात येत नाही, इतकी हुबेहूब कलाकुसर करण्यात आली आहे. आठ दिवसांच्या सततच्या मेहनतीतून ही कलाकृती पूर्ण करण्यात आली.

    किंमत, मजुरी आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा

    या चप्पलसाठी वापरण्यात आलेली चांदी दीड किलोपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. त्याची एकूण किंमत सुमारे चार लाख रुपये असून, कारागिरांना सुमारे 22 हजार रुपयांची मजुरी देण्यात आली आहे. एवढ्या महागड्या आणि हटके भेटीमुळे ही चप्पल चर्चेचा विषय ठरली आहे. पारंपरिक कौशल्य, श्रीमंती आणि हौस यांचा संगम या माध्यमातून दिसून येतो.

    विक्रांत माळी यांनी याच महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी चांदीची पिंपेही तयार केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या कारागिरीकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. कोल्हापूरची पारंपरिक चांदीकामाची परंपरा आणि आधुनिक मागण्यांची सांगड घालत अशा कलाकृती तयार होत असल्याने स्थानिक कारागिरांचे कौशल्यही अधोरेखित होत आहे.

    दरम्यान, या अनोख्या भेटीमुळे धोंड्याचा महिना अर्थात अधिक मासातील जावई-सासर यांच्यातील जिव्हाळा, परंपरेचा मान आणि कलाकुसरीचे महत्त्व पुन्हा एकदा समोर आले आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा