• Tue. Jun 9th, 2026

    Electric Shock: महावितरणाचा निष्काळजीपणा भोवला! उच्चदाब वाहिनीचा शॉक बसून तरुण जखमी, नौदलात जाण्याचे स्वप्न धुळीस

    Electric Shock: महावितरणाचा निष्काळजीपणा भोवला! उच्चदाब वाहिनीचा शॉक बसून तरुण जखमी, नौदलात जाण्याचे स्वप्न धुळीस

    Electric Shock: घटनेला दहा दिवसांहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही ‘महावितरण’कडून कोणतीही ठोस आर्थिक मदत मिळालेली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

    शॉक बसून तरुण जखमी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    पिंपरी : घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तरुणाला उच्च विद्युत वाहक तारेचा शॉक बसून तो गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना चऱ्होली खुर्द येथे घडली. या घटनेत तरुण ६५ टक्के भाजला असून, त्याच्या हात, पाय, पोट आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे नौदलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या या तरुणाचे आयुष्यच या दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त झाले आहे.

    अनिरुद्ध प्रशांत पाटील (वय १७, रा. एंजल स्कूलजवळ, चऱ्होली खुर्द) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अनिरुद्ध बारावीमध्ये शिक्षण घेत असून, त्याला भारतीय नौदलात भरती व्हायचे होते. त्यासाठी तो नियमित सराव करीत होता. ‘तायक्वांदो’ या कराटे प्रकारातही तो पारंगत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. पाटील कुटुंबाने २०१८मध्ये चऱ्होली येथे घर बांधले. वर्षभरापूर्वी ‘महावितरण’ने परिसरातील घरांच्या गच्चीजवळून उच्च विद्युत वाहक तार धोकादायक पद्धतीने टाकली. याबाबत परवानगी घेतली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

    Maharashtra TimesShivraj Motegaonkar : NEET पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकराला सीबीआयकडून अटक, मोठे खुलासे होणार
    उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनिरुद्ध चार मे रोजी रात्री गच्चीवर झोपण्यासाठी गेला होता. रात्री अकराच्या सुमारास उच्च विद्युत वाहक तारेच्या संपर्कात आल्याने त्याला जोरदार शॉक बसला आणि तो दूर फेकला गेला. यात तो गंभीररीत्या भाजला. घटनेनंतर त्याला सुरुवातीला भोसरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराचा वाढता खर्च परवडत नसल्याने कुटुंबीयांनी त्याला डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात हलविले.

    Maharashtra TimesFarmer News: महाराष्ट्रातील २० वर्षीय पठ्ठ्याची कमाल! शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शोधला अनोखा पर्याय, CM नेही केलं कौतुक
    ‘महावितरण’ने परिसरातील रहिवाशांची कोणतीही परवानगी न घेता घरांच्या गच्चीजवळून धोकादायक पद्धतीने उच्च विद्युत वाहक तार टाकली. ‘महावितरण’चा निष्काळजीपणा माझ्या मुलाच्या जीवावर बेतला आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी; तसेच उपचाराचा संपूर्ण खर्च करावा. -अर्चना पाटील, मुलाची आई

    या प्रकरणाची ‘महावितरण’च्या समितीमार्फत चौकशी सुरू आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. मुलाच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आर्थिक मदत दिली जाईल. – राजेंद्र गोरे, उपकार्यकारी अभियंता, ‘महावितरण’

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा