• Fri. Jun 5th, 2026
    दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर


    Marathi Live News: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी, ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी जीवशास्त्राच्या पुण्यातील प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक केली. त्या ‘नीट-यूजी’च्या प्रश्नपत्रिका निर्मिती समितीच्या सदस्य होत्या. सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि इतर आरोपींच्या चौकशीच्या आधारे ही अटक करण्यात आली. दरम्यान, नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी 1,100 पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात सादर केले. अवघ्या 15दिवसांत तपास पूर्ण करून पन्नासहून अधिक साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही, डीएनए चाचणीसह भक्कम पुरावे सादर केले आहेत. शिवाय, पुण्यातील हडपसर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. लष्कर न्यायालयाने त्याला 22 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed