• Fri. Sep 4th, 2026

Jalgaon Politics : जळगावच्या राजकारणात भूकंप, पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षांसह 11 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप आल्याचं बघायला मिळत आहे. कारण भुसावळ महापालिकेच्या माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जळगाव : भुसावळ नगरपालिकेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून गायत्री भंगाळे निवडून आल्यानंतर त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर भाजपच्या शैलजा नारखेडे या प्रभारी नगराध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना कुठेच न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून पक्षाच्या तब्बल 12 नगरसेवकांपैकी 11 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृतवातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा प्रहारचे जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी बुधवारी 2 सप्टेंबर रोजी मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी अर्थात गुरुवारी रात्री 10 वाजता भुसावळातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून निवडून आलेल्या 11 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ‘धनुष्यबाण’ हाती घेतला. एकाच वेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी धक्कातंत्राचा वापर करीत शिंदेंच्या शिवसेनेत केलेल्या प्रवेशाने भुसावळातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Maharashtra TimesVidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्या मराठीचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

माजी नगराध्यक्षांचाही शिवसेनेत प्रवेश

माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, भुसावळातील माजी आमदार संतोष चौधरींच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले गटनेता सचिन संतोष चौधरींसह 11 नगरसेवकांनी गुरुवारी रात्री मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी ही बाब धक्कादायक मानली जात आहे.

Maharashtra TimesMumbai Bus Fire : मुंबईत गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली बसला भीषण आग, पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

चौधरींच्या नेतृत्वात निवडून आलेले 11 नगरसेवक ‘शिवसेनेत’

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वात निवडून आलेल्या 12 पैकी 11 नगरसेवकांनी गुरुवारी रात्री शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश करणार्‍यांमध्ये गटनेता आणि नगरसेवक सचिन संतोष चौधरी (प्रभाग 19 ब), शेख दिलनबाज इक्बाल (प्रभाग क्र. 12 अ), उल्हास भीमराव पगारे (प्रभाग 2 अ), सुभद्रा गणपत गुंजाळ (प्रभाग 14 ब), अमीन निसार कुरेशी (15 अ), शेख नसीब बी. शेख नदीम (प्रभाग 15 ब), सचिन भास्कर पटेल (16 अ), अकिल नादर पिंजारी (प्रभाग 17 अ), शबाना बी.सिकंदर खान (प्रभाग 17 ब), पुष्पा कैलास चौधरी (प्रभाग 19 अ), सुनीता कृष्णा कर (प्रभाग 13 ब) यांचा समावेश आहे.

Maharashtra TimesSolapur News : सोलापुरात 86 वर्षांच्या माजी नगरसेवकावर हल्ला, 25 वर्षांपूर्वीच्या वादाच्या रागातून आरोपीचं कृत्य

Jalgaon News

नगरसेवक पद वाचवण्यासाठी गायत्री भंगाळे शिवसेनेत?

भुसावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद वाचवण्यासाठी गायत्री भंगाळे यांचा शिवसेनेत प्रवेश असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी आणि माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 2025 मध्ये झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत गायत्री भंगाळे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या होत्या. मात्र गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र समितीने अवैध ठरवल्याने त्यांचं नगराध्यक्ष पद अपात्र ठरवण्यात आलं होतं.