Dhule Man kills Parents : वादादरम्यान आई-वडिलांनी चंदनला त्याच्या पत्नीसमोर अपमानास्पद शब्द वापरले. बायकोसमोर आई-वडिलांनी आपला अपमान केला, ही गोष्ट चंदनच्या जिव्हारी लागली आणि त्याचा संताप अनावर झाला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, धुळे : मुलीच्या लग्नाचा सोहळा आनंदात पार पाडून घरी परतलेल्या दाम्पत्याच्या डोक्यात त्यांच्या पोटच्या मुलानेच मुसळ घालून त्यांची निर्घृण हत्या केली. पत्नीसमोर आई वडिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या रागातून मुलाने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आरोपीला वेळीच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं.
घरगुती कारणातून मुलासोबत वादावादी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील महावीर सोसायटीतील इंदाराम महतो आणि त्यांची पत्नी रांजुदेवी महतो हे आपल्या मुलीचे लग्न आटोपून आनंदाने घरी परतले होते. घरात लग्नाची लगबग आणि उत्साह कायम होता. मात्र, घरगुती कारणावरून त्यांचा मुलगा चंदन इंदाराम महतो याच्यासोबत काही कारणाने वाद झाला.
आई-वडिलांनी बायकोसमोर अपमान केल्याचा राग
वादादरम्यान आई-वडिलांनी चंदन याला त्याच्या पत्नीसमोर अपमानास्पद शब्द वापरले. पत्नीसमोर आई-वडिलांनी आपला अपमान केला, ही गोष्ट चंदनच्या जिव्हारी लागली आणि त्याचा राग अनावर झाला. त्याने घरातील मुसळ उचलून थेट जन्मदात्या आई आणि वडिलांच्या डोक्यात एकापाठोपाठ एक सपासप प्रहार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे रांजुदेवी महतो आणि इंदाराम महतो या दोघांचाही जागीच रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृत्यू झाला. NEET Paper Leak Case : नावात ‘यश’, पोस्टरवर झळकलेला अभ्यासू मुलगा निघाला नीट ‘पेपरफुटी’तील आरोपी; तर जयपूरच्या बिवाल कुटुंबातले तिघे ‘गुणवंत’ अटकेत
पळून जाण्याच्या तयारीत, शेजाऱ्यांनी पकडलं
स्वत:च्याच आई-वडिलांचा जीव घेतल्यानंतर संशयित चंदन पळून जाण्याच्या तयारीत होता. घरातून घाईघाईने बाहेर पडणाऱ्या चंदनला पाहून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने प्रसंगावधान राखून त्याला जागीच पकडून ठेवले आणि घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी चंदन याला ताब्यात घेतले.
Solapur | पेट्रोल दरवाढ झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया,सरकारचा एकच धर्म; निवडणुका आणि सत्ता
मालेगावी तरुणाचा दगडाने ठेचून खून
दुसरीकडे, मालेगाव शहरालगतच्या कोकणदरा शिवारात शेख जिया शेख हारुण (वय २३) या तरुणाचा अज्ञात संशयितांनी दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.१५) उघडकीस आली. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Crime News : धावत्या बसमध्ये कंडक्टर-ड्रायव्हरने विवाहितेसोबत नको ते केलं, डॉक्टर म्हणाले अॅडमिट व्हा, पीडिता म्हणाली, घरी गेले नाही तर चिमुरड्या लेकी उपाशी राहतील शुक्रवारी दुपारी हा खुनाचा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आला. कोकणदरा शिवारात दगडाने ठेचून जिया शेख या तरुणाचा अज्ञात संशयितांनी निर्घृणपणे खून केला. या घटनेची माहिती अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांना मिळताच त्यांनी पवारवाडी पोलिस ठाणे व फॉरेन्सिक लॅबच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जिया शेखचा खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला याचा तपास पोलिस करीत आहेत. घटनेतील संशयित आरोपींना पकडण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा