• Sun. Jun 14th, 2026

    Nashik Crime: नाशिकमध्ये माणुसकी ओशाळली! 70 वर्षीय नराधमाचा 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, घटनेनं संताप

    Nashik Crime: नाशिकमध्ये माणुसकी ओशाळली! 70 वर्षीय नराधमाचा 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, घटनेनं संताप

    Nashik News: पीडितेने आरडाओरडा करू नये म्हणून नराधमाने तिचे तोंड दाबून जीवे मारण्याची आणि आजीला कामावरून काढून टाकण्याची धमकी देखील दिली होती.

    सुनेत्रा पवारांनी पंख छाटताच प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या संपर्कात? सिल्व्हर ओकवर भेट घेतल्याची चर्चा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : नाशिकमध्ये 70 वर्षीय वृद्धाकडून त्याच्याच घरात असलेल्या केअरटेकर असलेल्या महिलेच्या नातीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीत कल्पतरू नगर, अशोक मार्ग येथे राहणाऱ्या संशयित 70 वर्षीय सूर्यकांत वाघ उर्फ अण्णा या नराधम वृद्धाने त्याच्याच घरी कामाला असणाऱ्या केअरटेकर वृद्धेच्या 15 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केला. घरातील एका बंद खोलीत पीडित अल्पवयीन मुलीला नेऊन तिचे तोंड दाबून अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी भागात राहणारी पीडित मुलगी आणि तिची आजी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. पीडितेची आजी ही संशयित वृद्ध वाघ याच्या घरी ‘केअरटेकर’ म्हणून काम करत होती. याच काळात संशयित सूर्यकांत वाघ याने पीडित मुलीला एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तसंच नंतर तिला धमकीही दिली. या धाकामुळे पीडितेने प्रदीर्घकाळ हे भयानक वास्तव कोणालाही सांगितले नाही. घाबरलेल्या पीडित अल्पवयीन मुलीने अखेर प्रकरणाला वाच्यता फोडली आणि मुंबई नाका पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली.

    पीडितेने दिलेल्या फिर्यादीहून मुंबई नाका पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच नाशिकच्या इंदिरानगर आणि अंबड पोलिस ठाणे हद्दीत देखील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इंदिरानगर परिसरातील धोंगडे नगर, आनंद नगर नाशिक येथे सुनील कुमार लालदा प्रसाद यादव (वय ३६) या नराधमाने दिनांक १४ मे रोजी १ वाजेच्या सुमारास परिसरातील एका मंडपामागे अल्पवयीन मुलीला घेऊन जाऊन तिचा विनयभंग करण्यात आला, त्यानंतर पीडित मुलीने तिच्या घरच्यांना सर्व प्रकार सांगितला. तिच्या घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीहून नाशिकच्या इंदिरानगर पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तिसरा गुन्हा हा अंबड पोलिस ठाणे हद्दीत घडला आहे. सह्याद्री नगर, सिडको येथे २१ वर्षीय संशयित आरोपी याने त्याच्याच चुलत अल्पवयीन बहिणीवर दिनांक २१ एप्रिल ते ११ मे २०२६ पर्यंत तिच्या आई वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे फिर्यादी यांच्या पुतण्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा