• Mon. Jun 15th, 2026

    नाशिकमध्ये ५० ई-बसेसची प्रतीक्षा! केंद्र व राज्याकडून कराराचा मसुदा प्रलंबित; वर्षभरापासून बसेस वेटिंगवर

    नाशिकमध्ये ५० ई-बसेसची प्रतीक्षा! केंद्र व राज्याकडून कराराचा मसुदा प्रलंबित; वर्षभरापासून बसेस वेटिंगवर

    Nashik E-Buses: नाशिकमध्ये 2021पासून ई-बस सेवा सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेला 50 ई-बसेस देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील ई-बसेस प्रलंबित आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: इंधनबचतीचा नारा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणामुळे नाशिक महापालिकेला ‘पीएम ई बस योजने अंतर्गत मिळणाऱ्या ५० ई-बसेस कराराअभावी रखडल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने ई-बसेससाठी नियुक्त केलेल्या ‘जेबीएम इको लाइफ’ या ऑपरेटर कंपनीसोबतचा महापालिकेचा करार रखडल्याने सिटीलिंकला ई-बसेसची वर्षभरानंतरही प्रतीक्षा आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून करारनाम्याचा मसुदा मिळत नसल्याने या बसेस वर्षभरापासून वेटिंगवर असल्याने सिटीलिंकला डिझेल बसेसचा वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे.

    मसुदा रखडला, करार लांबला

    आडगाव येथील ई-बस डेपोचे काम पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी जेबीएम इको लाइफ कंपनीसोबतचा करार होऊ शकलेला नाही. शासनाकडून कराराचा मसुदा अंतिम होऊ न शकल्याने ई-बसेसचा प्रवास लांबल्याचे बोलले जात आहे. पहिल्या टप्प्यातील ई-बसेसची प्रक्रिया पार पाडल्यानंतर उर्वरित ५० बसेससाठीची प्रक्रिया सुरू होईल.
    Maharashtra TimesNashik Ring Road: नाशिकमध्ये रस्तेविस्ताराचा ‘मास्टर प्लॅन’; ‘एनएमआरडीए’चा रिंगरोडसाठी पुढाकार, शेतकऱ्यांसमोर तीन पर्याय

    चार महिन्यांचा कालावधी

    केंद्र आणि राज्य शासनाकडून कराराचा मसुदा मिळाल्यानंतर पुढील सर्व प्रक्रियेला चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शासनाकडून करारनाम्याचा मसुदा प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार महापालिका (सिटीलिंक) आणि ऑपरेटर कंपनीसमवेत करारनामा केला जाईल. त्यानंतर संबधित कंपनीला ई-बसेस पुरवठा करण्याबाबतचे आदेश दिले जातील.

    या बसेससाठीही वेटिंग असल्यामुळे ई-बसेस नाशिकमध्ये आणण्यासाठी आणखी चार ते सहा महिन्यांचा अवधी लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ५० ई-बसेसही मंजूर झाल्या आहेत. आडगाव ट्रक ट्रर्मिनस येथे १०० -बसेसच्या पार्किंगची व्यवस्था असून, त्याचीही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

    Maharashtra TimesNavi Mumbai News: नवी मुंबईतील स्थानकांचा तिढा कायम; ‘सिडको’कडून मध्य रेल्वेकडे ताबा देणार, रेल्वे प्रवाशांची गैरसोय कायम राहणार

    नाशिकमध्ये पेट्रोल १०८ रुपयांच्या घरात

    इंधनदरांत शुक्रवार (दि. १५) पासून तीन रुपयांपेक्षा अधिकची वाढ करण्यात आली. त्यामुळे नाशिकमध्ये पेट्रोलचे दर ३.१५ रुपयांनी वाढून १०७.९३ रुपयांवर पोहोचले आहेत. डिझेलच्या दरातही ३.१० रुपयांची वाढ होऊन ते लिटरला ९४.४१ रुपयांवर पोहोचले आहेत. एप्रिल २०२२ मध्ये पेट्रोल १२० रुपयांच्या पुढे तर डिझेल शंभरीपार गेले होते. त्यानंतर केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर त्यात नऊ ते दहा रुपयांची कपात करण्यात आली होती. परिणामी, देशांतर्गत बाजारपेठेतील महागाई आटोक्यात आणण्यात यश आले होते.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा