• Thu. Jun 18th, 2026
    Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला; अंतरवाली सराटीत समाज एकटवणार, मनोज जरांगेंचा सरकारला बेधडक इशारा; उपोषण कधीपासून?

    Manoj Jarange Patil Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तलवार उपसली आहे. 30 मेपासून आमरण उपोषण सुरु होणार आहे.

    मनोज जरांगे आंदोलन ३० मे आंदोलन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जालना : मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा रान तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी पुन्हा मैदानात उतरणार आहेत. 30 मेपासून पुन्हा आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीतच आमरण उपोषण होणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. ‘आठ महिन्यांनंतरही सातारा गॅझेट लागू करण्याचं आश्वासन अपूर्णच आहे. मला आज प्रामाणिकपणाचं फळ मिळालं आहे’. मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे बैठक बोलावलीय. यावेळी ते बोलत होते.

    मनोज जरांगे काय म्हणाले?

    ‘आजची गर्दी पाहून मन भरुन आलंय. आज बैठक घेऊन आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहे. आरक्षणाचा मुद्दा अजिबात सोडायचा नाहीय. सरकारला मराठा समाजाला मोठं होऊच द्यायचं नाहीय. मराठा समाजाचा एवढा द्वेष कशासाठी?’, असा सवालही जरांगे यांनी केला आहे. ‘पक्षाच्या बाजूने राहाल तर तुमच्या लेकरांचं वाटोळं होईल. मराठा समाज पक्षाकडे बघत नाही, मराठा समाज बदलला याचा आनंद आहे. मराठा समाज संकटातून मार्ग काढतोय. सरकारकडून प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ होत आहे. आपल्याकडे रुपया नाही म्हणून पैसेवाले आपल्याकडे येत नाही’.
    Maharashtra TimesKolhapur News: जिथं पत्नी अन् दोन मुलांना गमावलं, तिथंच मृत्यूला कवटाळलं; पुण्यातील व्यक्तीची कोल्हापुरात धक्कादायक अखेर

    ‘समाजासाठी मी जीवाचं रान करायला तयार’

    ‘मराठा समाज लढला पण हटला नाही. सरकारकडून वारंवार मराठा समाजाची फसवणूक होत आहे. आंदोलनादरम्यान मराठा समाजाने मुंबई जिवंत केली. मी समाजासोबत प्रामाणिक राहिलो, त्याचं फळ मला मिळतंय. आता आंदोलन होणारच’, असा आक्रमक पवित्रा जरांगे पाटलांनी घेतला आहे. ‘मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलन करायचं आहे. मराठ्यांनी विचारांनी मुंबई जिवंत केली, मराठा समाजासाठी मी जीवाचं रान करायला तयार आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दोष देत नाही, पण प्रमाणपत्र का रोखले?’ असा सवाल करत ‘गोरगरीब मराठा हुशार आहे हे विसरु नका. कुणबी प्रमाणपत्र फडणवीसांनीच रोखलं’, असं जरांगेंनी म्हटलं आहे.

    ‘फडणवीसांचा मी विरोधक नाही, पण सत्य मी सांगणारच. पुढील प्रमाणपत्रं का रोखण्यात आली?’, असा सवाल मनोज जरागेंनी केला आहे. तुमच्या 50 पिढ्या आल्या तरी मराठा समाजाचं नुकसान होऊ देणार नाही. कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा आंदोलन तीव्र होणार. आंदोलनाच्या तारखेच्या आत प्रमाणपत्र द्या, नाहीतर तुमची सुट्टी नाही. कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांची मनं जिंका. सातारा आणि कोल्हापूर संस्थानचा जीआर का काढला नाही? 1994ला जो जीआर काढला, त्याच धर्तीवर जीआर काढावा. मी माझ्या समाजाशी कधीच बेईमान होणार नाही. खोटं बोलून मी पैसे कमवत नाही, पैसे कमवणारी गँग दुसरी आहे’.

    Maharashtra TimesPune Bishnoi Gang : ‘हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट…’; पुण्यात फर्निचर मॉलवर गोळीबार, लॉरेन्स बिष्णोई गँगचा धुमाकूळ, शुभम लोणकरची FB पोस्ट

    ‘कितीही डाव टाका, लढाई सोडणार नाही’

    ‘गरीब मराठा समाजाने मोठ्या विश्वासाने मला जबाबदारी दिली आहे. मराठा समाजाचं कल्याण झालं पाहिजे. मी जे काही सांगतोय ते सत्यच सांगतोय. टीका करायला मी मागेपुढे पाहणार नाही, पण कामापुढे वेळ नाही. एका मंत्र्याने एका संघटनेला दोन कोटी देण्याचं ठरवलंय. जरांगेंविरोधात बोलण्यासाठी कोट्यवधी रुपये देण्याचं ठरवलंय. पण ज्यांना कोट्यवधी देणार होते, तेच माझ्याकडे आले. कितीही झालं तरी जातीसाठी मी लढणार. बेईमानीच्या यादीत जाण्यापेक्षा मराठा समाजाचं कल्याण करा. माझं आयुष्य तुमच्या चरणी अर्पण, मराठा समाजासाठी लढतच राहणार. कितीही डाव टाका, लढाई सोडणार नाही’, अशा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा