• Sun. Jun 14th, 2026
    Satara News: शेतकरी कांदा फेकत असताना सीएम फडणवीसांची मोठी घोषणा! ‘या’ दराने होणार खरेदी, कर्जमाफीची प्रतिक्षाही संपली

    Devendra Fadnavis farmer announcement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. आजपासून १२.३५ रुपये दराने कांदा खरेदी सुरू होणार असून थकीत शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील: सातारा : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या दोन मोठ्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज साताऱ्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी मेळाव्यात केल्या. केंद्र सरकारने महाराष्ट्रात आजपासून १२ रूपये ३५ पैसे दराने कांदा खरेदी सुरू केली असून थकीत शेतकऱ्यांना ३० जून पूर्वी कर्जमाफी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाला अनुसरून राज्य सरकार पुढील सहा महिने कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित करणार नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील शेतकरी संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार कटिबद्ध असून विविध योजनांद्वारे आर्थिक मदत देण्याचे काम सातत्याने सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    दोन मोठ्या घोषणा केल्या

    केंद्रीय ग्रामविकास तथा कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत साताऱ्यात आज प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभार्थी मेळावा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या दोन मोठ्या घोषणा केल्या. फडणवीस म्हणाले की, दर नसल्याने शेतकरी कांदा फेकून देत आहे. म्हणून केंद्र सरकारने कांदा खरेदी करावा, अशी मागणी मी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली होती. Maharashtra TimesPune News: पुण्यातील बॉम्बप्रकरणात मोठा ट्विस्ट! आरोपीचा खरा प्लॅन समोर, पोलिसही थक्क

    त्यानुसार आजपासून केंद्र सरकारने १२ रूपये ३५ पैशाने कांदा खरेदी सुरू केली असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

    कर्जमाफीची प्रतिक्षा संपली

    थकित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रतिक्षाही मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे संपली आहे. येत्या ३० जून पूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या दोन्ही घोषणांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार संयुक्तपणे निर्णय घेत असून त्याचा थेट फायदा ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, उसाच्या एफआरपी, एमएसपी संदर्भात साखर कारखानदारांची पुढील आठवड्यात दिल्लीत कृषी मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा