अशोक खरात प्रकरणात प्रशासकीय अधिकारीही अडचणीत आल्याचे दिसत आहे.या प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी यापूर्वीच भांडे-खरात कनेक्शनचा आरोप केलेला.यावेळी दमानिया यांनी रूपाली चाकणकर यांनाही पुन्हा लक्ष्य केलं.गुवाहाटीतील चाकणकर आणि खरातच्या व्हायरल फोटोवरून दमानियांनी प्रतिक्रिया दिली. चाकणकर खोटं बोलत असून २ दिवसात पुरावे सादर करणार, असे त्या म्हणाल्या.