• Sat. Jun 13th, 2026
    NEET Paper Leak Case : पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘करिअर काऊन्सिलिंग’च्या नावे विद्यार्थ्यांचं सर्कल, टेलिग्रामवर विशिष्ट पासवर्ड; पेपरची छपाई कुठे झाली?

    NEET Paper Leak Case Update : वैद्यकीय शिक्षणासाठी सर्वांत महत्त्वाची मानली जाणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘नीट यूजी-2026’ मधील अनियमितता आणि कथित पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशीचा फास आवळला आहे. ‘सीबीआय’ने महाराष्ट्रासह अनेक राज्यांत छापेमारी करीत पाच जणांना अटक केली.

    नीट पेपरफुटी प्रकरण मनीषा वाघमारे ताब्यात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा ‘यूजी नीट’च्या पेपरफुटी प्रकरणात नाशिकचा संशयित शुभम खैरनार याच्यानंतर अहिल्यानगरातून संशयित धनंजय लोखंडे याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने ताब्यात घेतले आहे. संशयित शुभम याने ‘करिअर काऊन्सिलिंग’च्या (समुपदेशन) नावाने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे वर्तुळ तयार करून पेपरफुटीत ‘एन्ट्री’ केल्याची माहिती आहे. पुण्यातून त्याच्याकडे कुरिअरद्वारे पेपर पोहोचल्यानंतर खैरनारने ‘टेलिग्राम’वर हरियाणात त्याची विक्री केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

    ‘एसओजी’ पोलिसांमार्फत तपास सुरू

    देशभरातील 22 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेशाचे भवितव्य अवलंबून असलेल्या ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) 3 मे रोजी ही परीक्षा झाली होती. तत्पूर्वी सोशल मीडियावर परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याने राजस्थान येथील ‘एसओजी’ पोलिसांमार्फत तपास सुरू होता. ‘सीबीआय’ला या प्रकरणातील तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मंगळवारी (दि. 12) शहरातील शुभम मधुकर खैरनार (वय 27, रा. इंदिरानगर, मूळ रा. नांदगाव) याला पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोन पथकाने ताब्यात घेतले. रात्री उशिराने ‘सीबीआय’ने त्याला ताब्यात घेत मुंबईत नेले.
    Maharashtra TimesNida Khan : गर्भवती असल्याने निदा खानला तातडीने जामीन मिळावा; अर्जावर कोर्टाचा मोठा निर्णय, नाशिकरोड कारागृहातील मुक्काम वाढला
    तर बुधवारी (दि. 13) अहिल्यानगरातून धनंजय लोखंडे (सध्या रा. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. लोखंडे हा पुण्यात असताना त्याने कुरिअरद्वारे खैरनार याला ‘नीट’ची प्रश्नपत्रिका पाठवली होती. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर खैरनारने हरियाणा येथे ‘टेलिग्राम’द्वारे विक्री केली. दरम्यान, शुभम ‘बीएएमएस’च्या तिसऱ्या वर्षाला असून, ‘करिअर कौन्सिलर’ म्हणून तो कार्यरत होता. त्याने लाखो रुपयांच्या व्यवहारातून हा ‘उद्योग’ केला असून, टक्कल करून पलायनाच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

    वैद्यकीय प्रवेशाचाही ‘उद्योग’

    संशयित शुभम याने धनंजयकडून 10 लाख रुपयांत प्रश्नपत्रिका खरेदी केल्यानंतर हरियाणातील गुरुग्राम येथील मध्यस्थीला 15 लाखांत विक्री केली. शुभम हा मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. यादरम्यान, त्याने करिअर कौन्सिलिंगच्या नावे स्वतः वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावरून, फोनद्वारे, ऑनलाइन स्वरुपात त्याने मार्गदर्शनासह परीक्षांचे, महाविद्यालयांचे अर्ज भरणे किंबहुना प्रवेशाबाबतची कार्यवाहीचा ‘उद्योग’ सुरू केला. परराज्यातील विद्यार्थ्यांपर्यंतचे ‘नेटवर्क’ तयार झाल्याने संशयिताने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
    Maharashtra TimesSushma Andhare : खरातशी संबंध नाकारणाऱ्या चाकणकर तीन दिवस गुवाहाटीच्या हॉटेल ब्ल्यू रेडिसनमध्ये एकत्र होत्या, सुषमा अंधारेंचा आरोप

    शुभमचा गोरखधंदा

    शुभमसह इतर संशयितांच्या आर्थिक व्यवहाराबाबत सीबीआय तपास.

    शुभमचे वडील इलेक्ट्रोपथी डॉक्टर त्यांचे नांदगावात क्लिनिक.

    शुभम इंदिरानगरच्या दीपाली नगरात भाडेतत्त्वाच्या खोलीत पाच महिन्यांपासून राहत होता.

    शुभमचे रुममेट्स खासगी नोकरीत; कौन्सिलिंगच्या नावे शुभम पैसे आकारायचा.

    शुभम राहणाऱ्या सोसायटीतील रहिवाशांनीही केल्या तक्रारी.

    टेलिग्रामवर पीडीएफद्वारे पेपरची 15 लाखात विक्री; त्यासाठी विशिष्ट पासवर्ड.

    पासवर्ड देण्यासाठी विद्यार्थ्यांसह मध्यस्थींकडून पैसे उकळण्यात आले.

    पेपरची छपाई नाशिकमध्ये झालेली नाही; लोखंडेच्या चौकशीत खुलासे होणार.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा