• Sun. Jun 14th, 2026
    Mumbai Local : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, सलग तीन दिवस मध्यरात्री ब्लॉक, शेवटची लोकल कोणती? वाचा वेळापत्रक

    मध्य रेल्वे मार्गावर सलग तीन दिवस मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. 15 ते 17 मे या कालावधीत दररोज मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात काही लोकल ट्रेन दुसऱ्या मार्गावर वळवण्यात येतील. तर काही गाड्या रद्द होणार असल्याची माहिती आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही मध्य रेल्वे मार्गावर रात्री उशिरा किंवा भल्या पहाटे प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अनेक जण सेकंड शिफ्टला म्हणजे दुपारून आपल्या कार्यालयात जातात. त्यांना रात्री घरी जाण्यासाठी उशिर होतो. ते नियमितपणे लोकल ट्रेनने आपल्या घरी जातात. पण या सर्व नागरिकांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून विद्याविहार स्थानकावरील मधल्या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याकरिता विद्याविहार स्थानकावर (कुर्ला-भांडुप विभाग) विशेष वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

    मध्य रेल्वे, मुंबई विभाग विद्याविहार स्थानकावरील मधल्या पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याकरिता १५ आणि १६ मे(शुक्रवार/शनिवार रात्री), १६ आणि १७ मे (शनिवार/रविवार रात्री) आणि १७ आणि १८ मे (रविवार/सोमवार रात्री) रोजी विद्याविहार स्थानकावर (कुर्ला-भांडुप विभाग) विशेष वाहतूक आणि वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असं रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

    ब्लॉकची तारीख आणि कालावधी:

    १५ मे : ०१.१५ ते ०४.१५ (शुक्रवार/शनिवार रात्री)
    १६ मे : ००.१० ते ०४.४० (शनिवार/रविवार रात्री)
    १७ मे : ०१.१५ ते ०३.०५ (रविवार/सोमवार रात्री)

    ब्लॉक विभाग : कुर्ला (स्टेशन वगळून) ते भांडुप (क्रॉसओव्हर वगळून) या दिवशी:
    दिनांक १६.०५.२०२६ रोजी अप आणि डाउन धिम्या मार्गावर (शुक्रवार/शनिवार रात्री)
    दिनांक १६/१७.०५.२०२६ रोजी अप आणि डाउन धीमा मार्ग, जलद मार्ग, ५व्या आणि ६व्या मार्गावर (शनिवार/रविवार रात्री)
    दिनांक १५/१६.०५.२०२६ (शुक्रवार/शनिवार रात्री) रोजी धावणाऱ्या उपनगरी गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.
    दिनांक १६/१७.०५.२०२६ रोजी (शनिवार/रविवार रात्री) उपनगरीय गाड्यांचे कामकाज

    उपनगरी सेवेचे मार्गांतर

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री २३.३० ते ००.१२ पर्यंत सुटणाऱ्या कर्जत येथे जाणाऱ्या डाउन धीमी सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत.

    कसारा येथून रात्री २२.०० वाजता सुटणारी आणि बदलापूर येथून २३.२९ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी अप धीमी सेवा, तसेच कर्जत येथून पहाटे ०२.३० वाजता सुटणारी आणि अंबरनाथ येथून ०३.४३ वाजता सुटणारी सेवा, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या नाहूर, कांजूरमार्ग व विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत.

    खालील गाड्या रद्द राहतील

    ठाणे-कुर्ला उपनगरी ट्रेन, ठाणे येथून रात्री २३.४० वाजता सुटणारी
    ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन, ठाणे येथून पहाटे ०४.०४ वाजता सुटणारी
    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-ठाणे उपनगरी ट्रेन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री २३.३८ वाजता आणि ००.२४ वाजता सुटणारी

    खालील गाड्या कमी अंतरावर थांबवल्या जातील

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री २३.०० वाजता, २३.४६ वाजता, २३.५५ वाजता आणि २३.१२ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-ठाणे लोकल (वातानुकूलित उपनगरी ट्रेन) कुर्ला स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

    डोंबिवली – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन, डोंबिवली येथून रात्री २२.१८ वाजता सुटणारी ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. खालील गाड्या शॉर्ट ओरीजनेट करण्यात येईल.

    विद्याविहार येथून पहाटे ०४.४५ वाजता सुटणारी कुर्ला- टिटवाळा लोकल ठाणे येथून पहाटे ०५.०९ वाजता सुटेल.

    ठाणे येथून पहाटे ०४.१६ वाजता सुटणारी ठाणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कुर्ला येथून पहाटे ०४.४२ वाजता सुटेल.

    दिनांक १६/१७.०५.२०२६ (शनिवार/रविवार रात्री) रोजी धावणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस लोकलवर कोणताही परिणाम होणार नाही.

    दिनांक १७/१८.०५.२०२६ (रविवार/सोमवार रात्री) रोजी धावणाऱ्या लोकलवर कोणताही परिणाम होणार नाही.

    टीप : परिचालन गरजेनुसार मेल / एक्सप्रेस लोकल, विशेष लोकल (असल्यास), उशिरा धावणाऱ्या किंवा नंतरच्या तारखेला अधिसूचित केलेल्या उपनगरी ट्रेन इत्यादी गाड्यांचे मार्ग बदलले जातील.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा