• Mon. Jun 15th, 2026
    NEET Paper Leak: नीट घोटाळ्यात अहिल्यानगरचा डॉक्टर गजाआड, सीबीआयने न्यायालयाकडून मिळवली ट्रान्झिट रिमांड

    NEET पेपरफुटी प्रकरणात अहिल्यानगरमधील डॉ. धनंजय लोखंडेला सीबीआयने अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दिवसांची ट्रान्झिट कोठडी सुनावली असून, पुढील तपासासाठी त्याला दिल्लीला नेण्यात येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत अहिल्यानगरमधून डॉ. धनंजय निवृत्ती लोखंडे याला सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली. बुधवारी सकाळी डीएसपी चौक परिसरातून सीबीआयच्या मुंबई विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली.

    नवी दिल्ली येथे गुन्हा दाखल

    वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू असून, नवी दिल्ली येथे दाखल गंभीर गुन्ह्यात डॉ. लोखंडे याला हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी सीबीआयचे पोलिस उपअधीक्षक सत्य प्रकाश यांनी अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. देशातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी नीट परीक्षा ही लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पेपरफुटीमुळे निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांच्या फिर्यादीवरून नवी दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    हस्तांतरण कोठडीची मागणी

    दरम्यान, सीबीआयने डॉ. लोखंडे याला बुधवारी रात्री जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्या न्यायालयात हजर केले. यावेळी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे तसेच सीबीआयचे वकील सोनी यांनी न्यायालयासमोर पेपरफुटीच्या गंभीर परिणामांवर भर दिला. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा हा अत्यंत गंभीर प्रकार असून आरोपीला दिल्लीतील मुख्य गुन्ह्यात हजर करणे आवश्यक आहे, असा जोरदार युक्तिवाद सीबीआयकडून करण्यात आला. अहिल्यानगर ते नवी दिल्ली प्रवासासाठी दोन दिवस लागणार असल्याचे सांगत सीबीआयने हस्तांतरण कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत डॉ. लोखंडे याला दोन दिवसांच्या हस्तांतरण कोठडीची मंजुरी दिली.

    या कारवाईनंतर नीट पेपरफुटी प्रकरणातील मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत असून, सीबीआयच्या तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा