• Tue. Jun 16th, 2026
    Mumbai Crime: पुणेकर तरुणीने VC करुन मुंबईत संपवलं जीवन; माऊलीचा जीवघेणा आक्रोश, बाप हसत टाळ्या वाजवत होता

    Fashion Design Student Ends Life: वडिलांच्या संशयी स्वभावाला कंटाळून फॅशन डिझायनिंग विषय शिकणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने वरळी आपलं जीवन संपवलं.

    मुंबई क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : वडिलांच्या संशयी वृत्तीला कंटाळून फॅशन डिझायनिंग विषय शिकणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने वरळी येथे गळफास घेत नुकतीच आत्महत्या केली. पुणे जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या वडिलांना व्हिडीओ कॉल करून त्यांच्या देखत तिने गळफास घेतला. हे पाहून वडिलांनी थांबवायचे सोडून हसत टाळ्या वाजवल्या. मृत तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीआधारे वरळी पोलिसांनी तरुणीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नाली घेवारी असे मृत तरुणीचे नाव असून ती खारघरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी येथे शिकत होती. स्वप्नाली मूळची पुण्याच्या मंचर तालुक्यातील आंबेगावची रहिवासी आहे. तिचे वडील सुनील शेतकरी असून शेतीवरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. स्वप्नाली गेल्या चार महिन्यांपासून वरळी येथील महालक्ष्मी इमारतीत अन्य दोन तरुणींसह भाड्याने वास्तव्यास होती. सुनील यांचा स्वभाव संशयी होताच. मात्र त्यांना दारूचे व्यसनही होते. त्यामुळे त्यांचे आणि पत्नी स्वाती यांच्यात वारंवार वाद व्हायचे.

    Maharashtra TimesNCP Politics: राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब
    १ मे रोजी रात्री त्यांना स्वप्नालीने वरळी येथील निवासस्थानी गळफास घेतल्याचे समजले. त्या नायर रुग्णालयात आल्या. मुलीच्या आत्महत्येमुळे त्या मानसिकरित्या खचल्या होत्या. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर त्यांना स्वप्नालीने वडील सुनील यांच्या संशयी स्वभावाला आणि जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजले.

    आत्महत्येपूर्वी सुनील व स्वप्नाली यांच्यात फोनवरून वाद झाले. त्यानंतर स्वप्नालीने व्हिडीओ कॉल करत वडिलांच्या देखत गळफास घेतला. गळफास घेतल्यानंतर सुनील यांनी पत्नी स्वाती यांचे माहेर गाठून त्यांच्या भावाला हा प्रकार सांगितला. आता स्वातीचाही काटा काढतो, अशी धमकी दिली. त्याआधारे स्वाती यांनी तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

    Maharashtra TimesBird Flu In Maharashtra: चिकन प्रेमींनो सावधान! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट
    तर दुसऱ्या एका घटनेत, मित्रांसोबत इर्शाळगड येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या डोंबिवली येथील एका २० वर्षीय तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. रितेश कोणका असे मृत तरुणाचे नाव आहे.डोंबिवली येथील रितेश हा पाच मित्रांसोबत खालापूर तालुक्यातील इर्शालगडावर गेला होता. सोमवारी दुपारी डोंगरावर रितेश अचानक बेशुद्ध पडला. मित्रांनी डोंगराखालील रहिवाशांना कळवताच, त्यांनी धाव घेतल्याते सामाजिक कार्यकर्ते सौरभ घरत यांनी सांगितले. पोलिस तसेच बचाव पथकाला कळवण्यात आले. रितेशला चादरीची झोळी करून खाली आणण्यात आले. रुग्णवाहिकेतून चौक येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रितेश हा डोंबिवली येथील एसआय कॉलेजचा विद्यार्थी असून तो कोपर येथील रहिवासी आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा