Dangerous Buildings: सर्व 9 महापालिका आणि म्हाडाने मान्सूनपूर्वी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. परंतु, केवळ नोटीस बजावली असून सध्या केवळ मुंबईतील 72 इमारती रिकाम्या झाल्या आहेत आणि इतर रहिवासी तसेच बिकट परिस्थितीत राहत आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: महामुंबईतील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला असून म्हाडा आणि 9 महापालिकेने शहरातील काही धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 827 इमारती अतिधोकादायक असून 18,072 इमराती धोकादायक घोषित केल्या आहेत. त्यामुळे महामुंबई परिसरातील सर्व रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या सर्व इमरातींना नोटीस जाहीर केली असली पावसाळ्यापूर्वी सर्व इमारतींवर कारवाई करण्यात येईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबई शहरात किती धोकादायक इमारती ?
यापूर्वीच, महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी मान्सूनपूर्वी मुंबई शहरासाठी धोकादायक इमरातींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 174 इमरातींचा समावेश आहे. या इमराती ‘C1 धोकादायक श्रेणी’मध्ये समाविष्ट केल्या गेल्या आहेत. त्यापैकी 72 इमारती यापूर्वीच रिकाम्या करण्यात आल्या आहेत. इतर इमराती महामुंबई प्रदेशातील आहेत आणि यांना केवळ नोटीसा बजावल्या गेल्या आहेत.Mumbai News: वाहनांनंतर सागरी किनारा मार्गावर हेलिकॉप्टरचे उड्डाण; वरळी जेट्टीवर उभारणार ‘हेलिपॅड’, कसा होणार फायदा?
मान्सून सुरू होताच शहरातील जुन्या व जीर्ण इमारतींमध्ये गळती सुरू होते. त्यामुळे इमारती पडून अपघात होण्याची शक्यता वाढते. पण तरीही नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू ठेवून या इमारती रिकाम्या का केल्या जात नाहीत असा सवाल केला जात आहेत. परंतु, महापालिकेकडे या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना याच इमारतींमध्ये राहण्याऐवजी काही पर्याय उरत नाही.
ठाणे जिल्ह्यातही तीच परिस्थिती
दरम्यान, ठाणे जिल्हा प्रशासनाने नुकतीच मान्सूनपूर्व तयारीसाठी आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी काही हाय रिस्क म्हणजेच अतिधोकादाय इमारतींचे तातडीने संरचनात्मक परिक्षण करावे असे निर्देश दिले आहेत. अनेकवेला पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे, जुन्या इमारतींचा भाग कोसळणे आणि पुल कोसळण्यासारख्या दुर्घटनांचे प्रमाण शहरात वाढले आहे. यंदा कमीत कमी दुर्घटना व्हाव्या या हेतूने बैठक घेऊन कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.
Maharashtra Weather: तापमानाने गाठला दहा वर्षांचा उच्चांक! पुन्हा पारा चाळिशीजवळ; तापमान वाढीचं नेमकं कारण काय?
दरम्यान, अशाच इमरातींची यादी इतर महापालिकांकडूनही जाहीर करण्यात आली आहे. महामुंबईचा भाग असलेल्या मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मिरा-भाईंदर आणि पनवेल या 9 महापालिकांनेही याद्या जाहीर केल्या आहेत. या सर्व मिळून शहरात हजारो इमराती धोकादायक ठरल्या आहेत.
या इमराती ओळखून, त्या रिकाम्या करून त्यांना पुनर्वसनासाठी पाठवलं जातं. परंतु, अशावेळी नागरिकांना पर्यायी जागा किंवा त्यांच्या खोलीचे भाडे दिले जाते. पण या योजना अजूनही कागदावरच असून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाही आहेत. त्यामुळे नगारिकांना या पावसाळ्यातीही धोकादायक इमरातींमध्येच रहावं लागणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा