Pune Apte Road Businessman Ashok Jain Body : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यात एक मोठी घटना समोर आली आहे. आपटे रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये व्यावसायिक अशोक जैन यांचं पार्थिव आढळलं आहे.
आपटे रोड हॉटेल अशोक जैन मृतदेह(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यातील व्यावसायिक अशोक जैन (वय 61) हे एका हॉटेलच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी विषारी पदार्थ सेवन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खोलीचा दरवाजा बराच वेळ ठोठावला, पण आतून काहीच हालचाल झाली नाही. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचा संशय वाढला आणि काही क्षणातच पुण्यातल्या आपटे रोड परिसरात मोठी धावपळ सुरू झाली. दरवाजा उघडला आणि आतलं दृश्य पाहून सगळेच हादरले.
स्वत:ला संपवल्याचा संशय
ही घटना शनिवारी 9 मे रोजी दुपारी उघडकीस आली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा बंद असल्याचं लक्षात येताच पोलिसांना माहिती दिली. डेक्कन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि खोली उघडली. त्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. अशोक जैन हे शुक्रवारी 8 मे रोजी दुपारी घरातून बाहेर पडले होते. मात्र, रात्रीपर्यंत ते परतलेच नाहीत. फोनही लागत नसल्यानं घरच्यांनी शोधाशोध सुरू केली होती. अखेर स्वारगेट पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. Bird Flu In Maharashtra: चिकन प्रेमींनो सावधान! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट
घटनास्थळी पोलिसांना सापडली चिठ्ठी
दरम्यान, पोलिसांनी खोलीची झाडाझडती घेतली असता एक चिठ्ठी सापडली आहे. परिस्थिती पाहता हा आत्महत्येचा प्रकार असल्याचं प्रथमदर्शनी वाटत असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चिठ्ठीत कारण लिहिलं
पोलिसांच्या माहितीनुसार, त्या चिठ्ठीत आर्थिक अडचणींचा उल्लेख असल्याचं समोर आलं आहे. मात्र ही चिठ्ठी खरंच अशोक जैन यांनीच लिहिली आहे का? याची सविस्तर पडताळणी नातेवाईकांच्या मदतीने केली जाणार आहे. या घटनेमुळे शहरात आणि व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा आणि इतर पुरावे तपासले जात असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. Nida Khan : महत्त्वाचे पुरावे एकत्र, पोलिसांनी कोर्टात धडाधड मुद्दे सांगितले, निदा खानची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात दरम्यान, पुणे हे शहर शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. पण शहरात रोज अशा गुन्हेगारीच्या घडत असल्यामुळे पुण्याला गुन्हेगारीचं माहेरघर म्हणून आता संबोधलं जात आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा