• Sat. Jun 6th, 2026

    Bird Flu In Maharashtra: चिकन प्रेमींनो सावधान! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट

    Bird Flu In Maharashtra: चिकन प्रेमींनो सावधान! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट

    Bird Flu In Maharashtra: ​नवापूर परिसरातील झालेल्या बर्ड फ्लूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून तातडीने पावले उचलण्यात आली आहेत.

    बर्ड फ्लू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    अनुराग कांबळे, मुंबई : नंदुरबारच्या नवापूर येथे पसरलेला बर्ड फ्लूमुळे आत्तापर्यंत १२ पोल्ट्री फार्ममधील पक्षी मारण्याची वेळ आली असून ३.८९ लाख कोंबड्या तसेच, २१ लाख अंड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. काही कोंबड्यांना या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे गेल्या महिन्यात उघड झाले होते. तेव्हापासून ८ मेपर्यंत प्रशासनाकडून दिवसरात्र यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच, शेजारील राज्यांनाही याविषयीची माहिती देण्यात आली असून परिसरातील पोल्ट्री फार्ममालकांना याविषयी खबरदारी राखण्यास सांगण्यात आले आहे.

    नवापूरमधील डायमंड पोल्ट्री फार्मच्या ४० हजार कोंबड्यांमधील ७० कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करून लक्षणांनुसार इतर कोंबड्यांवर औषधोपचार केले. परंतु तरीही पक्षी मृत होण्याचे प्रकार थांबले नाही. दरम्यान इतर तीन फार्मवरही पक्षी मृतावस्थेत आढळले.

    Maharashtra TimesNCP Politics: राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब
    एकूण १.७१ लाख कोंबड्या असलेल्या या फार्मवरील १,२८९ कोंबड्या अचानक मृतावस्थेत आढळल्याने रोग अन्वेषण विभाग, पुणे येथून बर्ड फ्लूच्या निदानासाठी राष्ट्रीय उच्चसुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ (मध्य प्रदेश) येथे २७ एप्रिल रोजी नमुने पाठवले. या नमुन्यांनुसार हा बर्ड फ्लूचाच प्रकार असल्यावर २९ एप्रिल रोजी स्पष्ट झाले. त्यानंतर एक किलोमीटरच्या परिसरातील २.४७लाख कोंबड्या, ९.२७ लाख अंडी आणि २.८६ लाख किलो पक्षी खाद्य शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आले.

    परंतु, ४ मे रोजी परिसरातील पक्ष्यांचे नमुने पुन्हा पाठविण्यात आले. त्यात आणखी चार पोल्ट्रींमध्ये संसर्ग आढळून आला. त्यामुळे आणखी ठिकाणच्या कोंबड्या आणि अंड्यांनी विल्हेवाट लावण्यात आली. ८ मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १२ पोल्ट्री फार्ममध्ये एकूण संसर्ग झाला असून त्यातून ३.८९ लाख कोंबड्या, २१.६१ लाख अंडी आणि ४.९९ लाख किलो पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे. तर, परिसरातील फार्मवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

    Maharashtra TimesPalghar News : बाबांवर उपचार सुरु आहेत; खोटी समजूत घालत लेकीचं लग्न पार पाडलं, पाठवणीवेळी कळलं पित्याचं छत्र कायमचं हरपलं!
    नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव
    एकीकडे रोगाचा संसर्ग मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, पोल्ट्रीमालकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठीही पशुसंवर्धन विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आत्तापर्यंत झालेल्या हानीच्या पार्श्वभूमीवर विभागाने एकूण नऊ कोटी रुपयांची आवश्यकता लागणार असल्याचा अंदाज वर्तवला असून त्यापैकी ५० टक्के म्हणजे ४.५० कोटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच, राज्य सरकारकडून मदत मिळावी यासाठीही विभागाने प्रस्ताव सादर केला आहे.

    सद्यस्थितीत ज्या फार्ममध्ये हा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले तेथील पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. परिसरातील इतर फार्मवरही पशुवैद्यकीय अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनीही घाबरून जाण्याचीही गरज नाही. तसेच, अफवांवरही विश्वास ठेवू नये.- डॉ. शीतलकुमार मुकणे, अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा