NCP Internal Conflict: पटेल आणि तटकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत मात्र कायम ठेवले आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पक्षातील भवितव्याविषयी अद्याप प्रश्नचिन्ह आहे.
या नव्या पत्रात केवळ सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष तर शिवाजीराव गर्जे हे कोषाध्यक्ष म्हणून नमूद करण्यात आले आहे. तर, राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून पार्थ आणि जय पवार यांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
Shrikant Shinde Daura: श्रीकांत शिंदेंचा राज्यव्यापी दौरा; 22 जिल्हे अन् 100हून अधिक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार, कसा असेल दौरा?
फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर त्याविषयीची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी पक्षाकडून १० मार्च रोजी देण्यात आली होती. पत्रात पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे त्यांचे पदच लिहिण्यात आलेले नव्हते. त्यामुळे वादळ निर्माण झाले होते. मात्र, त्यावर पक्षाकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नव्हते. पक्षात पटेल-तटकरे आणि पार्थ पवार यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यातच ११ मे रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आलेल्या एका तीन पानी पत्रामुळे या दाव्यावर आता शिक्कामोर्तब कऱण्यात आले आहे.
२९ एप्रिलला राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुधारित पदाधिकाऱ्यांची यादी पाठविण्यात येत असल्याचे म्हटले आहे. ही यादी अंतिम असेल असेही या पत्रात म्हटले आहे. यात राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष, शिवाजीरावर गर्जे हे कोषाध्यक्ष पार्थ पवार अणि सुबोध मोहिते हे सरचिटणीस तर जय पवार राष्ट्रीय सचिव अशी पदे असतील. अविनाश आदिक, सना मलिक, धीरज शर्मा, संजय प्रजापती, राणा रणवीर सिंग, डॉ. रमन प्रीत सिंग, धनंजय शर्मा आणि डॉ. अभिषेक बोके यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
राजकीय आकसबुद्धीने मला अडकवण्यासाठी माझ्यावर कारवाई, हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारे थेट बोलल्या
राष्ट्रीय कार्यकारिणीत मात्र, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना ठेवण्यात आले असले तरी त्यांच्या नावासमोर पक्षातील कुठल्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. २२ सदस्यीय कार्यकारिणीतही पार्थ आणि जय पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पटेल आणि तटकरे यांची पक्षातील पदे काढून घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
