जळगावमध्ये एका बांगलादेशी तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. ही तरुणी जळगावात राहणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्या प्रेमातून ती बेकायदेशीरपणे भारतात आली, असा दावा तिने केला आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : जळगाव पोलिसांनी एका बांगलादेशी तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी जळगावात राहणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्यामुळे ती भारतात बेकायदेशीरपणे आली आणि तिने त्या तरुणासोबत लग्न करत संसार थाटल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर आपल्याला सर्वांना परिचित आहेच. प्रेमातूनच सीमा ही भारतात दाखल झाली होती. अशीच ही घटना आहे. फेसबुकवर प्रेम जुळले आणि थेट बांगलादेशी तरुणी जळगावत पोहचली. या बांगलादेशी तरुणीला पोलिसांनी अटक केली असून तिला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
जळगाव शहरातील शनिपेठ पोलिसांनी अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेत तिच्यासह तिला आश्रय देणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना भोई गल्ली, जोशी पेठ परिसरात एक परदेशी महिला विना परवाना राहत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. यावेळी 20 वर्षीय कोणीका राणी शामलचंद्र राय ही महिला आढळून आली. तपासात ती कोणतेही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसताना बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून राहत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, कोणीका राणी आणि जळगावातील सोने कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला यांची फेसबुकवर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले लग्नासाठी कोणीका हिने थेट बांगलादेशची सीमा ओलांडून भारतात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कोणीका राणी आणि चिन्मय वाला यांच्याविरुद्ध इमिग्रेशन व परदेशी कायदा २०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करून बांगलादेशी तरुणीला अटक केली आहे. दरम्यान कोणीका आणि चिन्मय हे दोघेजण आम्ही लग्न केले असल्याचे सांगत आहेत. परंतु याबाबतचा त्यांच्याकडे कुठलाही पुरावा अद्याप तरी आढळून आलेला नाही. आज बांगलादेशी मोनिका राणी हिला जळगाव न्यायालयात हजर केले असता तिला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. तरुणी या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी करीत आहेत.
पोलीस काय म्हणाले?
जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. “बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या बांगलादेशी आणि इतर परदेशी नागरिकांच्या विरोधात जळगाव पोलिसांनी एक मोहीम हाती घेतलेली आहे. त्या अनुषंगाने जळगाव पोलिसांना एक बांगलादेशी महिला बेकायदेशीरपणे शहरात राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तपास केला असता, संबंधित तरुणीकडे बांगलादेशी पासपोर्ट मिळाला आहे. ही मुलगी आणि तिचा नवरा या दोघांना आरोपी म्हणून नोंद करण्यात आलं आहे”, अशी माहिती श्रीकांत धिवरे यांनी दिली.
“दोघांचं लग्न पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. महिला जंगल मार्गाने भारतात आली होती, असं प्राथमिक तपासात समजत आहे. आज तिला कोर्टात हजर करण्यात आलं आहे. तिला जळगावला येण्यामागे प्रेम प्रकरणाचं कारण सांगितलं आहे. महिलेच्या नवऱ्याचं नाव चिन्मय पाला असं आहे. तो 25 वर्षांचा आहे. त्यांची 2024 मध्ये फेसबुकवर ओळख झाली होती. त्यांचं अफेयर झालं होतं. ती बांगलादेशातून पळून आली. त्यासाठी तिला बांगलादेशच्या दोन लोकांनी सहकार्य केलं, असं तिचं म्हणणं आहे. पश्चिम बंगालला लग्न झाल्यानंतर ती इथे आली. तिचा नवरा इथेच कामाला होता. त्यामुळे ती नवऱ्यासोबत इथे येऊन राहत होती”, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा