Pune Supaul Bihar Express Woman Gives Birth : पुण्याहून सुटणाऱ्या बिहार एक्स्प्रेसमध्ये एका महिलेनं एका गोंडसा बाळाला जन्म दिला. धावत्या रेल्वेतच उमटला नवजीवाचा पहिला आवाज.
प्रवाशांच्या मदतीने डब्यातच आवश्यक व्यवस्था
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे संरक्षण दलाचे कॉन्स्टेबल सोमनाथ पाठाडे आणि हेड कॉन्स्टेबल विश्वजित काकडे यांनी तत्काळ त्या डब्याकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी जराही वेळ न दवडता महिलेला धीर दिला. प्रवाशांच्या मदतीने डब्यातच आवश्यक व्यवस्था करण्यात आली. वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतानाही जवानांनी प्रसंगावधान राखून सुरक्षित प्रसूती पार पाडण्यास मदत केली. काही वेळातच बाळाच्या रडण्याचा आवाज डब्यात घुमला आणि तणावाचे वातावरण आनंदात बदलले. त्यानंतर अहिल्यानगर स्थानकावर आई आणि नवजात बाळाला सुरक्षितपणे खाली उतरवून 108 रुग्णवाहिकेद्वारे ‘सिव्हिल हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले.
Thane News: ‘ठाणे-घोडबंदर’ आता सुसाट! रुंदीकरणासाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा; ठाणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार
रेल्वेच्या जागांना मिळणार मालकी हक्क
राज्यातील रेल्वेच्या हजारो एकर जमिनींच्या मालकी हक्काबाबत स्पष्ट नोंदी नसल्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर रेल्वेने सादर केलेल्या प्रस्तावानुसार महसूल विभागाने स्वतंत्र सात-बारा उतारे तयार करून ‘भारत सरकार रेल्वे’ या नावाने मालकी हक्क नोंदविण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयामुळे रेल्वेच्या मालकीच्या जमिनींचे सर्व्हे क्रमांक, नकाशे आणि निश्चित हद्दींची पडताळणी करून संबंधित गाव नकाशांमध्ये शेवटचा सर्व्हे क्रमांक किंवा गट क्रमांक निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या जमिनींची नोंद सात-बारा आणि मिळकत पत्रिकांमध्ये ‘भारत सरकार रेल्वे’ या नावाने करण्यात येईल. यासाठी आवश्यक कार्यवाहीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.राज्यात मूळ सर्वेक्षण आणि जमाबंदी प्रक्रियेनंतर; तसेच रेल्वेमार्गांच्या विस्तारासाठी खासगी जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, या जमिनींच्या मालकी हक्काचे पुरावे उपलब्ध नसल्याचे समोर आले होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करून सात-बारा व मालमत्ता पत्रिकांमध्ये स्वतंत्र नोंदी करण्याची मागणी केली होती. याबाबत सर्वप्रथम ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महसूल विभागाने ही प्रक्रिया सुरू केली आहे.
Weather Alert: राज्यात उन्हामुळे काहिली! वादळी पावसाचा इशारा तरीही तापमान चढेच राहणार; मराठवाडा, विदर्भ, कोकणात ‘अलर्ट’
‘भारत सरकार रेल्वे’
मूळ सर्वेक्षणातील नकाशे आणि आकारबंदांचा अभ्यास करून, रेल्वेमार्गांची सलग हद्द निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी ‘कमी-जास्त पत्रक’ (कजाप) तयार करून आकारबंद व गाव नकाशांमध्ये दुरुस्ती केली जाईल; तसेच नव्या सात-बारांमध्ये ‘भारत सरकार रेल्वे’ अशी नोंद करण्यात येईल. तिसऱ्या रकान्यात एकूण क्षेत्र आणि चौथ्या रकान्यात ‘पोट खराबा’ अशी नोंद केली जाणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षकांकडून ‘कजाप’ पत्रक तयार करून, त्याच्या आधारे तलाठ्यांकडून गाव नकाशे आणि आकारबंदामध्ये लाल शाईने नोंदी करण्यात येतील. त्यानंतर स्वतंत्र सात-बारावर रेल्वेच्या हक्काची नोंद केली जाईल.
