‘दि ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ निवडणुकीत मित्र पक्षांमध्येच उभी फूट पडली आहे. महायुतीच्या ‘परिवर्तन पॅनल’समोर ‘सहकार पॅनल’चे नवे आव्हान उभे राहिले आहे. भाजपमधील एक गट, शिवसेना, बविआ, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाकडून सहकार पॅनलची घोषणा करण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘दि ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ (टीडीसीसी) निवडणुकीत अखेर केंद्रात आणि राज्यातील सत्तेत एकत्रित असलेल्या महायुतीतच फूट पडली आहे. महायुतीच्या ‘परिवर्तन पॅनल’ विरुद्ध भाजपमधील नेतेमंडळी, शिवसेना, बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) ‘सहकार पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणातील पारंपरिक शत्रू असलेल्या नेत्यांनी सहकार क्षेत्रात एकमेकांविरोधात शड्डू ठोकले आहे. त्यामुळे आता महायुतीतच थेट सामना रंगण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाण्यातील भाजप ठाणे जिल्हा विभागीय कार्यालयातील पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी जिल्हा बँक निवडणुका महायुती एकत्रित लढेल, असे सुतोवाच केले. महायुतीचे पुरस्कृत ‘परिवर्तन पॅनल’ रिंगणात उतरले असून काही मतभेद असतील ते देखील दूर करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला होता.
मात्र एकीकडे ही घोषणा होत असताना दुसरीकडे शिवसेनेचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार रवींद्र फाटक यांची जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे आणि अरुण पाटील, माजी संचालक ज्ञानेश्वर डुंबरे, रंभाजी जगताप, संदीप कालेकर यांनी भेट घेतली. या बैठकीत सहकार पॅनलच्या विजयासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच सहकार पॅनलच्या काही सदस्यांनी शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचीही भेट घेतली. या दोन्ही भेटीत निवडणुकीतील रणनीती, मतदारांशी संपर्क तसेच उमेदवारांच्या निवडीबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे समोर आले. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते महायुतीच्या परिवर्तन पॅनलची घोषणा करत असताना महायुतीतच बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सहकार पॅनलची घोषणा
निवडणुकीतील सहकार पॅनलची आज, सोमवार, १५ जून रोजी घोषणा झाली. या निवडणुकीत शिवसेना, भाजप, बहुजन विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस (शप) ‘सहकार पॅनल’ रिंगणात उतरवले आहे. भाजपच्या ‘परिवर्तन पॅनल’समोर सहकार पॅनलचे आव्हान दिल्याची ठाण्यातील पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. पॅनलच्या घोषणेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) खासदार सुरेश म्हात्रे, भाजपचे आमदार किसन कथोरे, शिवसेना आमदार रविंद्र फाटक आणि ‘बविआ’चे नेते हितेंद्र ठाकूर उपस्थित होते.
पारंपरिक राजकीय शत्रू आमनेसामने
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झालेली असताना त्यांच्याकडे महायुतीच्या परिवर्तन पॅनल प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पाटील यांना लोकसभा निवडणुकीत शह दिलेले ‘राष्ट्रवादी’चे सुरेश म्हात्रे हे पाटील यांच्या विरोधातील महायुतीच्याच सहकार पॅनलमध्ये सहभागी झाले आहेत. यासोबतच पाटील यांच्यासोबत असलेला भाजपचे आमदार किसन कथोरे यांचा राजकीय वाद सर्वश्रुत असल्याने कथोरे समर्थकांनी परिवर्तन पॅनलमध्ये डावलल्याचे आरोप करत सहकार पॅनलचा पर्याय उभा केला.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा