Chhagan Bhujbal: खासदारकी हा माध्यमांमध्ये चर्चा करण्याचा विषय नाही आणि पक्षाकडून विचारणाही झालेली नाही. यासंदर्भात केवळ माध्यमांमध्येच चर्चा सुरू असल्याचे सांगून त्यांनी खासदारकीच्या चर्चेबाबतची हवाच काढून घेतली.
उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख सुनेत्राताईंचा नुकताच खासदारकीचा राजीनामा झालेला असून, त्या पश्चिम बंगालमध्ये शपथविधीसाठी गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या वेळेप्रमाणे बैठकी होतील. पश्चिम बंगालमध्ये भाजपने निवडणुकीसाठी खूप कष्ट घेतल्याने मतदानात मोठा फरक पडला. भाजपला दुप्पट-तिप्पट मतदान जास्त झाले. त्यामुळे या विजयावर कोणी बोट ठेवू नये, असेही भुजबळ यांनी नमूद केले. पत्रकारांशी बोलतांना भुजबळांनी त्यांच्या खासदारकीच्या उमेदवारीबाबत स्पष्ट भाष्य केले. खासदारांवर चर्चा तुम्ही करता, आम्ही करत नाही.
Nashik Farmer Death: कांदा वाचविण्याच्या प्रयत्नात गेला जीव; वादळी वाऱ्यामुळे अंगावर झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू, बागलाण तालुक्यातील घटना
अटकेमागे राजकारण नाही
निदा खान प्रकरणात आरोप असताना संशयित आरोपीला लपवून ठेवणे हा गुन्हा असल्याचे सांगत पोलिस तपास सुरू असल्याचेही भुजबळांनी स्पष्ट केले. या अटकेमागे काही राजकारण आहे असे वाटत नाही. पक्षाचे प्रमुखही यावर काही बोलले नाहीत, असेही त्यांनी सांगितले. वारकरी शाईफेक प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. शाईफेक कुणावरही करू नये, वारकरी संप्रदाय फार मोठा आहे. वेगवेगळे विचार मांडणारे सर्वत्र असतात, वारकरी मंडळी हुशार आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यावे, असे भुजबळांनी स्पष्ट केले.
Nida Khan : तुमच्या सुरक्षेचा आढावा घ्यायचाय; पोलिसांचं नगरसेवकांना आमंत्रण, MIM च्या मतीन पटेलवर ‘बॉम्ब’, निदा खान फ्लॅटवर सापडली
‘पीएनजी’ जोडणीचे आवाहन
ज्या भागात पीएनजी पाइपलाइन गेली आहे, त्या ठिकाणच्या नागरिकांनी तातडीने पीएनजी जोडणी घ्यावी, असे आवाहन भुजबळ यांनी केले. या नागरिकांसाठी जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे पीएनजी असेल त्यांची एलपीजी जोडणी बंद केली जाणार असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
