Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. भुकेने व्याकुळ 9 महिन्यांच्या बाळाचं रडणं ऐकून घरचे धावले तेवा समोर आईचं पार्थिव लटकत होतं.
संभाजीनगर आपेगाव विवाहितेची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : ज्या वयात बाळाला आईच्या मायेची सर्वात जास्त गरज असते, त्याच वयात एका नऊ महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले आहे. खुलताबाद तालुक्यातील भडजी येथे एका 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पहाटेच्या शांततेत चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकून घरचे धावत आले, तेव्हा समोर जे दृश्य होते त्याने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. आईचं पार्थिव छताला लटकत होता आणि खाली तिचे बाळ भुकेने व्याकुळ होऊन रडत होते.
दोन वर्षापूर्वीच झालेलं लग्न
गायत्री आकाश वाकळे असं गळफास घेतलेल्या नवविवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील आपेगाव येथील गायत्री हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी भडजी येथील आकाश वाकळे यांच्याशी झाला होता. संसाराची नवी स्वप्ने पाहत असलेल्या गायत्रीच्या आयुष्यात नऊ महिन्यांपूर्वीच कन्यारत्नाचे आगमन झाले होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना गायत्रीने इतके टोकाचे पाऊल का उचलले? हा प्रश्न आता सर्वांना सतावत आहे. Weather Update: उन्हाचा तडाखा कमी होणार! अंदमानात यंदा मान्सूनआगमन लवकर; काय सांगतो ‘स्कायमेट’चा अंदाज?
भडजी शिवारातील त्या काळरात्री नक्की काय घडलं?
पहाटेच्या सुमारास घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत होते. गायत्रीने घरातील लोखंडी पाईपाला साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. पहाटे 9 वाजेच्या सुमारास जेव्हा तिची नऊ महिन्यांची मुलगी भूक लागल्याने ओरडून रडू लागली, तेव्हा घरातील सदस्यांना जाग आली. गायत्रीच्या खोलीचा दरवाजा उघडताच समोर गायत्रीने जगाचा निरोप घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी पाठवलं. वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना गायसमुद्रे यांनी तपासणी केल्यानंतर गायत्रीला मृत घोषित केले. Supriya Sule Car Accident : खासदार सुप्रिया सुळेंच्या कारचा अपघात, भरधाव वाहनाची धडक; गुजरात पासिंगचं वाहन आई काय असते, हे कळण्यापूर्वीच तिचे छत्र हरपल्याने उपस्थित प्रत्येक जण हळहळत होता. चिमुकलीच्या रडण्याने केवळ घरचेच नाही, तर संपूर्ण गाव हेलावून गेलं आहे. खुलताबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गायत्रीने घरगुती वादातून हे पाऊल उचलले? की यामागे काही वेगळे मानसिक कारण आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा