• Wed. Jun 10th, 2026

    Pune News: पुण्याला आणखी एक महामार्ग मिळणार! ‘नेरळ-शिरूर महामार्गा’ला सरकारची मान्यता; मुंबई-अहिल्यानगर थेट प्रवास शक्य

    Pune News: पुण्याला आणखी एक महामार्ग मिळणार! ‘नेरळ-शिरूर महामार्गा’ला सरकारची मान्यता; मुंबई-अहिल्यानगर थेट प्रवास शक्य

    Neral-Shirur Highway: या 133.715 किमी लांब कॉरिडोरमुळ मुंबईहून अहिल्यानगरला जाण्यासाठी एक नवा पर्याय मिळणार आहे. या मार्गामुळे मुंबई, पुणे आणि अहिल्यानगरमधील कनेकटीव्हीटी सुधारणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे-मुंबई दरम्यानची भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन नेरळवरून थेट नाशिक आणि अहिल्यानगर मार्गला जोडणाऱ्या नेरळ-शिरूर या चारपदरी महामार्गाच्या बांधकामाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातून आणखी एका नवा महामार्ग तयार होणार असून, मुंबईहून थेट अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी एक नवा पर्यायी मार्ग तयार होणार आहे.

    १२०० कोटींचा प्रकल्प

    राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने गेल्या मार्चमध्ये नव्या मार्गाला मंजुरी दिली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी रस्त्याच्या भूसंपादनासाठी १२०० कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली असून, हा रस्ता खासगीकरणाच्या माध्यमातून (टोल रोड) विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.Maharashtra TimesPune News: पुण्याचा प्रवास भुयारी मार्गांतून! शहरात पाच बोगद्यांना गती; कात्रज, येरवाडा, स्वारगेटला जोडणार

    शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हा रस्ता विकसित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमध्ये मान्यता मिळाल्यानंतर सरकारने भूसंपादनाला गती देण्यासाठी निधी खर्च करण्यासही मंजुरी दिल्याने या रस्त्याला आता अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही वर्षांपूर्वी भीमाशंकर घाटरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले होते. मात्र, त्यानंतर वन जमिनीची परवानगी अपेक्षित वेळेत मिळू न शकल्याने काम रखडले होते. मात्र, आता या कामाला वेग आला आहे.

    कसा असेल हा मार्ग ?

    • रायगड जिल्ह्यातील नेरळ-बदलापूर रस्त्यावर नेरळ येथून या चौपदरी महामार्गाची सुरुवात होणार आहे.
    • पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर शिरूर येथे हा महामार्ग समाप्त होणार आहे.
    • नेरळजवळील वांद्रे, तेथून पाइंट, शिरोळी, पाबळ, मळठण मार्गे शिरूरपर्यंतची या मार्गाची आखणी निश्चित करण्यात आली आहे.
    • या महामार्गासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
    • भीमाशंकर अभयारण्य आणि वन जमिनीचे मोठे क्षेत्र या महामार्गात येत असल्याने त्यासाठी विविध परवानग्यांची आवश्यकता.

    “हा मार्ग राज्याच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणार आहे. खेड एसीझेड, तळेगाव, चाकण, रांजणगाव व सुपा औद्योगिक क्षेत्रांना या मार्गाचा मोठा फायदा होणार असून, खेड, शिरूर, आंबेगाव आणि मावळ परिसरातील विकासाला नवी गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी अजितदादा पवार यांनी विशेष पाठपुरावा व सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. त्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

    मालवाहतुकीचा वेळ कमी होणार

    अहिल्यानगरहून मुंबईकडे (जेएनपीटी) येण्यासाठी हा नवा महामार्ग उपलब्ध झाल्याने माल वाहतुकीमध्ये जाणारा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे; तसेच पुणे-नाशिक महामार्गाजवळूनच हा महामार्ग विकसित केला जाणार असल्याने तळेगाव-चाकण या औद्योगिक पट्ट्यातील माल वाहतुकीसाठी आणखी एक नवा पर्याय तयार होणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा