• Tue. Jun 9th, 2026

    Nashik Farmer Death: कांदा वाचविण्याच्या प्रयत्नात गेला जीव; वादळी वाऱ्यामुळे अंगावर झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू, बागलाण तालुक्यातील घटना

    Nashik Farmer Death: कांदा वाचविण्याच्या प्रयत्नात गेला जीव; वादळी वाऱ्यामुळे अंगावर झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू, बागलाण तालुक्यातील घटना

    Nashik Farmer Death: मनाला चटका लावून जाणारी घटना बागलाण तालुक्यात घडली आहे. कांदा वाचविण्यासाठी शेताच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्याच्या अंगावर झाडाची फांदी पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

    बागलाण तालुक्यातील शेतकऱ्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, सटाणा : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कांदा वाचविण्यासाठी शेताकडे धाव घेतलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या अंगावर वादळी वाऱ्यात झाडाची फांदी पडून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ७) दुपारी दोनच्या सुमारास बिजोटे-आखतवाडे रस्त्यावर ही घटना घडली. बापू सखाराम जाधव (वय ६०, रा. बिजोटे, ता. बागलाण) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बापू जाधव हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांची शेती बिजोटे-जायखेडा रस्त्यावरील गट क्रमांक १७१ मध्ये आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा उघड्यावर असल्याने वातावरणात अचानक बदल होताच त्यांची चिंता वाढली होती. दरम्यान, ते नातेवाइकांच्या लग्नसमारंभासाठी नामपूर येथे गेले होते. दुपारनंतर वादळी वारे सुरू झाल्याने आणि पावसाची चिन्हे दिसू लागल्याने त्यांनी तातडीने आपल्या लुना वाहनाने शेताकडे धाव घेतली. कांद्याच्या पोळ्या झाकण्यासाठी ते निघाले होते.

    Maharashtra TimesSSC Result 2026 Success Story: अपघाताच्या वेदनेवर हिमतीने मात; रुग्णवाहिकेतून परीक्षा देऊन नाशिकच्या हर्षलने 10वीत मिळवले 77 टक्के
    वादळाच्या तडाख्याने मृत्यूला गाठले
    बिजोटेजवळील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय परिसरात पोहोचताच वादळाच्या तडाख्याने झाडाची मोठी फांदी बापू जाधव यांच्या अंगावर कोसळली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले, तर त्यांची लुना काही अंतरावर जाऊन पडली. आवाज ऐकून परिसरातील शेतकरी मदतीला धावले. सरपंच पोपट जाधव यांनी जायखेडा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी जखमी बापू जाधव यांना रुग्णवाहिकेतून नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वराज देशमुख यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

    Maharashtra TimesNida Khan : निदा खानला लपवणारा MIM नगरसेवक मतीन पटेल याच्यावर गुन्हा, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
    ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेंद्र बच्छाव पुढील तपास करीत आहेत. सायंकाळी बिजोटे येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा