• Sun. Jun 7th, 2026
    Jalna Crime : कुणी नवरदेवाचे बूट लपवले, कुणी नवरीची चप्पल पळवली, किरकोळ कारणावरुन मंडपातच तुंबळ हाणामारी; Video

    Jalna Crime News : नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल पळवल्याने लग्न मंडपात राडा झाल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. वधू आणि वर पक्षात मारामारी झाली आहे.

    अंबड लग्नात हाणामारी व्हिडिओ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील नांदी गावात एका लग्नसमारंभात नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल पळवण्याच्या किरकोळ कारणावरून वधू आणि वर पक्षातील मंडळींमध्ये तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नवरदेवाचा बूट लपवला

    मिळालेल्या माहितीनुसार, काल गुरुवारी रोजी नांदी गावात एका विवाह सोहळ्यादरम्यान पारंपरिक पद्धतीने वधू पक्षातील काही तरुणींनी आणि नातेवाईकांनी नवरदेवाचा बूट लपवला. तर दुसऱ्या पक्षातील तरुणी आणि नातेवाईकांनी नवरीची चप्पल पळवली. लग्नातील ही थट्टा-मस्करीची परंपरा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवातीला हसत-खेळत सुरू असलेला हा प्रकार काही वेळातच वादात परिवर्तित झाला. बूट परत देण्यावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वधू आणि वर पक्षातील काहीजण एकमेकांना धक्काबुक्की करताना तसेच मारहाण करताना दिसून येत आहेत. लग्नसमारंभात उपस्थित असलेल्या महिलांसह नातेवाईकांमध्येही गोंधळ उडाल्याचं दिसत आहे. काहींनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वातावरण अधिकच तापल्यानं लग्नसोहळ्याला गालबोट लागलं.

    Maharashtra TimesAhilyanagar News : ‘अशा किती ममता बॅनर्जी आल्या, तरी देश वाकणार नाही’; पश्चिम बंगालच्या निकालावर मंत्री विखेंचा घणाघात

    थट्टा-मस्करीचे रूपांतर हिंसक वादात

    घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणाची माहिती अंबड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगी छोट्या कारणावरून झालेल्या या राड्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. सोशल मीडियावरही या घटनेचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत असून नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पारंपरिक थट्टा-मस्करीचे रूपांतर हिंसक वादात झाल्याने अनेकांनी खेद व्यक्त केला आहे. अंबड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा