एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी निदा खान प्रकरणात मोठं वक्तव्य केलं आहे. निदा खान हिला आश्रय देणाऱ्या एमआयएमच्या नगरेसवकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जलील यांना प्रश्न विचारला असता, निदा खान हिने माझ्याकडे मदत मागितली असती तर मी सुद्धा केली असती, असं मोठं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी एमआयआएमचा आमदार मतीन पटेल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनादेखील निदा खानला मदत केल्याच्या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी केली आहे. संजय शिरसाट यांच्या या आरोपांवर इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही आपल्यावर आरोप केल्याने आपण दोषी ठरत नाही, अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी मांडली. याचवेळी पत्रकारांना प्रतिक्रिया देत असताना, इम्तियाज जलील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. निदा खान ही केवळ आरोपी आहे, ती दोषी आढळलेली नाही. तिने मदत मागितली असती तर मी सुद्धा केली असती, असं मोठं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं आहे.
“खूप दिवसांपासून हे प्रकरण सुरु आहे. निदा खान या मुलीच्या नावाने नॉन बेलेबल वॉरंट निघालं आहे का? लूक आऊट नोटीस निघाली आहे का? आतापर्यंत केवळ आरोप आहेत ना? इतकं गंभीर असलं असतं, तिला काही दहशवादी कृत्यात सहभागी असल्याचा संशय असता तर पोलिसांनी स्वत: लूक आऊट नोटीस जारी केली असती. एक एफआयआरमध्ये तिचं नाव आलेलं आहे. त्या एफआयआरमध्ये कम्युनल हेट्रेट, हर्टिंग रिलीजन सेंटिमेंट्स हे आरोप तिच्यावर आहेत. पण असं वातावरण तयार केलं जात आहे, जसं तिने मोठा दरोडा टाकला आहे. खूप साऱ्या लोकांची हत्या केलेली आहे. किंवा तिचा काही दहशवादी कृत्याशी संबंधित संबध आहे, असं नाहीय. आपण FIR वाचून मला प्रश्न विचारले तर मी उत्तर देणार”, अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी मांडली.
‘पालकमंत्र्यांना भाव देत नाही’, इम्तियाज जलील यांची टीका
“पोलिसांनी एफआयआर केला असेल तर ते नियमांप्रमाणे कारवाई करतील. त्यांनी एफआयआर केला असेल तर त्यामध्ये काही तथ्य असेल. या प्रकरणात काय रोल आहे, माझ्या लोकांनाही त्याबाबत प्रश्न विचारणार आहे. पण तिला अटक केल्यानंतर माझा या प्रकरणात संबंध आहे, असं पालकमंत्री बोलत आहेत. मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही. मला जे प्रश्न विचारणार आहेत ते पोलीस आयुक्त विचारतील. मी त्यांना सहकार्य करेन”, असं जलील म्हणाले.
‘निदा खान फक्त आरोपी’, जलील यांचा दावा
“मी आजही निदा खानची बाजू घेतो. मी पब्लिक प्लॅटफॉर्मवर बोललो. एफआयआरमध्ये काहीही नाही. मी तिला स्पष्ट सांगितलं होतं की, तुझी चूक झाली असेल तर मी तुझ्या पाठिशी उभा राहणार नाही. तू म्हणत आहे तसं फक्त झालं असेल तर आम्ही प्रामाणिकपणे पू्र्ण ताकदीने तुझ्यासोबत राहणार आहोत. कारण न्यायालय योग्य निर्णय देणार”, असं इम्तियाज जलील म्हणाले.
“निदा खान हिने माझ्याकडे मदत मागितली असती तर कदाचित मी सुद्धा तिला मदत केली असती. कारण ती केवळ फक्त आरोपी आहे. आरोपी आणि दोषी यांच्यात फरक असतो. आरोप मी तुमच्यावरही करु शकतो. ते आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती दोषी नसते. आता पोलीस मला जे प्रश्न विचारतील. मी शंभर टक्के पोलिसांना सहकार्य करेन. मग छत्रपती संभाजीनगर पोलीस असोत किंवा नाशिक पोलीस असतील, पण कुणीतरी यामध्ये राजकारण करत आहे”, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.
“मला पूर्ण केस समजू द्या. पोलिसांचं म्हणणं काय आहे ते ऐकणार. मला पूर्ण विश्वास आहे, ती हायकोर्टात गेली असती तर तिला दोनशे टक्के बेल मिळाली असती. तिला तो संविधानिक अधिकार आहे. कोणत्याही आरोपीचा अधिकार आहे की, कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणं. पण आता ती सापडली. सापडल्यानंतर आता फाशीवर लटकावे असेच प्रयत्न आहेत”, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा