• Sat. Jun 6th, 2026
    उन्हाळी सुट्ट्या एसटीला पावल्या, एप्रिलमध्ये पुणे विभागाच्या उत्पन्नात 4 कोटींची वाढ, विशेष गाड्यांचीही भर

    Pune News : एप्रिल महिन्यात पुणे एसटी विभागाचे उत्पन्न चार कोटी रुपयांनी वाढले असून पुढील दोन महिने ही गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे एसटीला त्याचा मोठा फायदा होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागातील बससेवेला प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे एसटीला मोठा फायदा झाला असून, एप्रिल महिन्यात पुणे एसटी विभागाचे उत्पन्न चार कोटी रुपयांनी वाढले आहे. पुढील दोन महिने ही गर्दी कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे एसटीला त्याचा मोठा फायदा होणार आहे.

    सुट्ट्यांमुळे एसटीला मागणी

    पुण्यात नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातील नागरिक राहतात. उन्हाळी सुट्टीत हे नागरिक गावी अथवा पर्यटनासाठी जातात. रेल्वेचे तिकीट दोन महिने अगोदरच फुल्ल झाल्यामुळे नागरिकांकडून एसटीचा पर्याय निवडला जातो. एसटी महामंडळाकडूनही उन्हाळी सुट्टीत वाढती गर्दी लक्षात घेऊन जाता बस सोडण्याचे नियोजन केले जाते. शाळांना सुट्ट्या लागल्याने विद्यार्थ्यांसह पालक ठिकठिकाणी फिरायला जाण्याचे नियोजन करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विशेष एसटी बसेस सोडण्यास येत असून, बुकिंगही सुरू आहे.

    पुण्यातून विशेष बसगाड्या

    यंदादेखील उन्हाळी सुट्टीचा वाढता ताण लक्षात घेऊन शिवाजीनगर, वल्लभनगर आणि स्वारगेट येथून विशेष बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. पुण्यातून विदर्भ व मराठवाड्याकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे या भागांकडे जाणाऱ्या गाड्यांना विशेष मागणी असते. त्यानुसार नियोजन केले जाते; तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूरसाठीदेखील विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. या गाड्यांना एप्रिल महिन्यात मोठी गर्दी वाढल्याचे दिसून आले आहे. रेल्वेचे आरक्षण फुल्ल असल्याने अनेक जण बाहेरगावी प्रवासाला जाण्यासाठी एसटी बसला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.

    महिन्याभरात उत्पन्न चार कोटींनी वाढलं

    पुणे एसटी विभागाच्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात सुमारे ६६ लाख ३२ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यातून विभागाला ५७ कोटी ९७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. एप्रिलमध्ये मात्र प्रवासी संख्या वाढून ६८ लाखांवर पोहोचली. त्यामुळे उत्पन्नातही वाढ होत सुमारे ६२ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. म्हणजेच एका महिन्यात प्रवासी संख्या दोन लाखांनी वाढली असून, उत्पन्नात चार कोटींची भर पडली आहे.

    पुणे एसटी विभागामधून एप्रिल संख्या वाढली आहे. त्यामुळे उत्पन्नातदेखील चार कोटींनी वाढली आहे. वाढती प्रवासी संख्या पाहता प्रवाशांच्या सोयीसाठी नियोजन करण्यात आले आहे. – अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा