Chhatrapati Sambhajinagar News: एक शेतकरी आपल्या शेतातील नांगरण्याचे काम करत असताना त्याला रस्त्याच्या जवळच एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचं दिसून आलं.
बँकेतील KYC साठी गेलेल्या महिलेला क्रूरपणे संपवलं; रस्त्याकडेला बॉडी आढळली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरून बँकेच्या कामासाठी निघालेल्या एका ४६ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना गवळीशिवरा-आरापूर शिवारात मंगळवारी उघडकीस आली. या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
सुमन कडू काकडे (वय ४६, रा. वडाळी, ह.मु. गवळी धानोरा, ता. गंगापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सुमन काकडे या त्यांच्या माहेरी गवळी धानोरा येथे भावाकडे राहत होत्या. सकाळी त्या आपल्या बँकेचे केवायसी अपडेट करण्यासाठी लासूर स्टेशनला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, सायंकाळ झाली तरी त्या घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी दुपारी गवळीशिवरा शिवारातील गट क्रमांक ८९ मध्ये एक शेतकरी आपले शेत नांगरण्याचे काम करत होता. यावेळी त्याला रस्त्यालगत एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याने तातडीने पोलीस पाटलांना माहिती दिली आणि त्यानंतर शिल्येगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रुप केला आरोपीने अत्यंत क्रूरपणे सुमन काकडे यांचा खून केला होता. हत्येनंतर त्यांची ओळख पटू नये, या उद्देशाने दगडाने ठेचून त्यांचा चेहरा विद्रुप करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने बेपत्ता महिलांच्या नोंदी तपासल्या आणि इतर खुणांवरून हा मृतदेह सुमन काकडे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा