• Sun. Jun 14th, 2026

    Maharashtra Highway Projects: राज्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना गती! पुणे-सातारा, नागपूर-अमरावती, शिरूर-अहिल्यानगर… कसा होणार विकास?

    Maharashtra Highway Projects: राज्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना गती! पुणे-सातारा, नागपूर-अमरावती, शिरूर-अहिल्यानगर… कसा होणार विकास?

    Nitin Gadkari: नितीन गडकरींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील 9 महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. हे रस्ते प्रकल्प एकूण 527 किमी लांब असून राज्यातील अनेक भागांमध्ये बांधले जात आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण महामार्ग विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा मंगळवारी घेण्यात आला. राज्यातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कॉरिडोर प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गडकरी यांनी राज्यातील महामार्ग प्रकल्पांना गती देण्यासाठी अनेक सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

    कोणत्या प्रकल्पांचा समावेश

    राज्यातील रस्ते संपर्क अधिक सक्षम करणे, लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढविणे आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पांच्या नियोजन व अंमलबजावणी प्रक्रियेला गती देणे या उद्देशाने ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. नागपूर-भंडारा टप्प्याचे सहा पदरीकरण, तळोदा-बुऱ्हाणपूर टप्प्याचे चार पदरीकरण, दुर्ग-गडचिरोली -मंचेरियाल कॉरिडोर, गडचिरोली -कांकेर (रायपूर-विशाखापट्टणम) कॉरिडोर, ग्वाल्हेर-नागपूर कॉरिडोर, नागपूर-हैदराबाद कॉरिडोर, भंडारा-रायपूर टप्प्याचे सहा पदरीकरण, लखनादोन-दुर्ग-रायपूर कॉरिडॉर, नागपूर-अमरावती टप्प्याचे सहा पदरीकरण, मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमा-नागपूर बायपास-बोरखेडी टप्प्याचे, तसेच पुणे-सातारा टप्प्याचे सहा पदरीकरण या प्रकल्पांचा आढावा यावेळी घेण्यात आला.Maharashtra TimesPurandar International Airport: पुरंदर विमानतळाचे ‘टेकऑफ’! पहिल्याच दिवशी 450 एकर जमीन ताब्यात, शेतकऱ्यांना भरगच्च पॅकेज; कोणती गावे समाविष्ट?

    या बैठकीत राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवरील सुमारे साडेपाचशे किलोमीटर लांबीच्या नऊ बीओटी प्रकल्पांचाही सखोल आढावा घेण्यात आला. यात शिरूर-अहिल्यानगर, अहिल्यानगर- वडाळा, वडाळा -छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, जालना -लातूर, नांदेड-नरसी -देगलूर, जाम-वरोरा, वरोरा -चंद्रपूर -बामणी आणि मलकापूर -चिखली या कॉरिडोरचा समावेश आहे.

    गेल्या 11 वर्षांत भारतातील रस्त्याचे जाळे झपाट्याने विस्तारत आहेत. त्यामुळे देशातील 1,46,560 किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांसह हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते बनले आहेत. केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत 57,125 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले आहेत. यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारासह सरासरी वार्षिक रोजगार निर्मिती सुमारे 33 कोटी मनुष्य-दिवस इतकी झाली आहे, असे नुकत्याच संसदेत सादर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

    Maharashtra TimesMumbai News: मुंबईतील 70 वर्षे जुनी चाळ जमीनदोस्त होणार, निरोप घेताना रहिवाशांचे डोळे पाणावले; शिवडी-वरळी उन्नत मार्गाचा मार्ग मोकळा

    चणा खरेदीची कमाल मर्यादा वाढवली

    केंद्र सरकारने रब्बी हंगामासाठी चणा (हरबरा) खरेदीची कमाल मर्यादा वाढवून ८.१९ लाख मेट्रिक टन केली. यामुळे हरबरा उत्पादकांना सुमारे ४,८१६.८० कोटी रुपयांची किमान आधारभूत किंमत मिळणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी हा निर्णय नुकताच जाहीर केला. सरकारने हरबरा शेतकऱ्यांसाठी खरेदीची अंतिम मुदत वाढवून २९ मे २०२६पर्यंत केली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा