Mumbai News: मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कामांमुळे श्वास कोंडण्याची स्थिती असताना, तिसऱ्या व चौथ्या मुंबईचा विस्तार कसा होणार? यावर मुख्यमंत्र्यांनी भविष्यातील या नियोजित शहरांचे महत्त्व अधोरेखित केले.
उत्तम श्वासासाठीच तिसरी, चौथी मुंबई विकसित होणार; ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘मुंबई हे एक बेट असल्याने या शहराच्या मर्यादा आहेत. मुंबईची जवळपास ५५ ते ६० टक्के जागा सीआरझेड, वनजमीन इत्यादीने व्यापलेली असल्याने कमी जागेत अधिक लोकसंख्येचे राहणे अपरिहार्य ठरते. अशा परिस्थितीत लोकांना चांगले आयुष्य द्यायचे असेल, तर मुख्य शहराच्या आसपास संलग्न शहरे विकसित करणे हाच उपाय आहे. त्या दृष्टीने मुंबईला उत्तम श्वास घेता यावा, यासाठीच तिसरी व चौथी मुंबई विकसित होणार आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘विकसित महाराष्ट्र’ या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात केले.
गेटवे ऑफ इंडियासमोरील ‘द ताज महाल पॅलेस हॉटेल’मध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या खास उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक पराग करंदीकर यांनी विविध क्षेत्रातील महत्त्वांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना बोलते केले.
‘केंद्र सरकारने जो नागरी आव्हान निधी तयार केला आहे, त्यात नवी शहरे तयार होण्याचीच अपेक्षा आहेत; शिवाय आपण जगातील उदाहरणेही पाहिली, तर कोणत्याही मोठ्या शहरात लहान-लहान शहरे तयार होतात आणि त्या माध्यमातूनच मोठ्या शहरांची कोंडी कमी होते. मुंबईची कोंडी कमी होण्यासाठी तिसरी व चौथी मुंबई आवश्यकच आहे’, असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
‘मुंबईतील जमिनीची कमतरता लक्षात घेता, दोनच उपाय आहेत. घनता वाढवून सुविधा व मोकळ्या जागा निर्माण करणे आणि दुसरे समांतर शहर निर्माण करणे. ७०च्या दशकात नवी मुंबई शहराची निर्मिती केली. त्यातील अंतराचा अडथळा अटल सेतूमुळे दूर झाला. आता अटल सेतू व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईहूनही मोठे शहर, म्हणजे तिसरी मुंबई आपण निर्माण करणार आहोत. हे शहर नियोजनबद्ध असेल; शिवाय त्यात एक लाख विद्यार्थी व सर्व विदेशी विद्यापीठांचा समावेश असणारी ‘एज्युसिटी’ असेल. वैद्यकीय पर्यटनाच्या दृष्टीने ‘मेडिसिटी’ असेल. तसेच इनोव्हेशन सिटी व जीसीसी सिटी असेल. चौथ्या मुंबईत वाढवणचे बंदर आणि विरार यांच्या मध्ये देशातील पहिला ऑफशोअर विमानतळ तयार होणार आहे. त्याचा व्यवहार्यता अहवाल आला असून, आता पुढची सर्वेक्षणे सुरू आहेत. हे मुंबईचे तिसरे विमानतळ असेल’, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
‘एका वांद्रे-संकुलासारखी (बीकेसी) दहा बीकेसी निर्माण करण्याची गरज आहे; म्हणूनच तिसऱ्या मुंबईची निर्मिती होणार आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा