Gadchiroli Woman Death: खराब रस्ते, निकामी उपकरणे आणि कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे अखेर त्या महिलेला डॉक्टरांपुढे रुग्णालयातच जीव गमवावा लागला. प्रशासकीय अनास्थेने पुन्हा एक बळी घेतला.
मृत्यू पाठलाग करीत होता आणि नातेवाईकांची तिला वाचविण्याची धडपड सुरू होती. त्यांनी एटापल्लीला जाण्याचा निर्णय घेतला तर शासकीय रुग्णवाहिकेचा चालक सुटीवर होता. अडचणी संपत नव्हत्या. वेळ भराभर पुढे सरकत होता. शासकीय चालकाच्या अनुपस्थितीत एका तरुणाने रुग्णवाहिकेचे स्टीअरिंग हाती घेतले. वेळेत पोहोचविले. मात्र उपचारांना उशीर झाल्याने तिचा जीवनाचा प्रवास अखेर संपला.
Boycott On Census: ओबीसींचा स्वतंत्र रकाना, तरच जनगणना! गोंदिया जिल्ह्यातील शंभरावर गावांत लागले बहिष्काराचे बॅनर
मीरा गणेश लेखामी (२५) असे मृत महिलेचे नाव असून त्या एटापल्ली तालुक्यातील कांदोळी येथील रहिवासी होत्या. लेखामी यांनी सोमवारी दुपारी घरगुती वादातून विषप्राशन केले. मात्र, दुर्गम भागात रुग्णवाहिका वेळेत मिळणे शक्य नसल्याने नातेवाईकांनी त्यांना दुचाकीवरुन नजिकच्या बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा निर्णय घेतला. एका जागरूक नागरिकाने पुढाकार घेत आरोग्य केंद्रात आधीच कळविल्याने डॉक्टरही तयारीत होते. मात्र, शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेले ‘सक्शन’ यंत्र बंद पडले. त्यामुळे लेखामी यांना एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. परंतु, रुग्णवाहिकेचा चालक रजेवर होता.
Raigad Beach Tar Balls Pollution: रायगडच्या समुद्रकिनारी डांबराचा खच; मासोळीवर विषबाधेचे सावट, मानवी आरोग्यालाही मोठा धोका
अत्यवस्थ असलेल्या लेखामी यांना एटापल्ली येथे कसे न्यायचे, हा प्रश्न निर्माण झाला. अखेर प्रतीक मुधोळकर या स्थानिक तरुणाने धाडस दाखवत रुग्णवाहिकेचे स्टीयरिंग हाती घेतले आणि जीवाशी शर्यत करत अवघ्या २५ मिनिटांत रुग्णवाहिका एटापल्लीत पोहोचवली. येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, हे उपचार सुरू होण्यास बराच उशीर झाला होता. अर्ध्या तासाच्या झुंजीनंतर लेखामी यांनी रुग्णालयातच प्राण सोडले. एका तरुणीचा जीव वाचवण्यासाठी कुटुंबीयांची धडपड, नागरिकांचा पुढाकार आणि डॉक्टरांचे प्रयत्न-सगळेच अपुरे पडले.
