• Sun. Jun 7th, 2026

    Mumbai Local: भलत्याच ट्रेनसाठी भलतेच ‘इंडिकेटर’! पश्चिम रेल्वेचा ढिसाळ कारभार; विरार-डहाणू मार्गावरील प्रवाशांचे दररोज हाल

    Mumbai Local: भलत्याच ट्रेनसाठी भलतेच ‘इंडिकेटर’! पश्चिम रेल्वेचा ढिसाळ कारभार; विरार-डहाणू मार्गावरील प्रवाशांचे दररोज हाल

    Western Railway: पश्चिम रेल्वेवर विरार-डहाणूकडे जाणाऱ्या लोकलचं वेळापत्रक बदललं आहे. डहाणूपर्यंत जाणाऱ्या लोकलसाठी विरार लोकलचं इंडिकेटर दाखवले जात असल्यामुळे प्रवाशांचा दररोज गोंधळ उडत आहे.

    म.टा. वृत्तसेवा, पालघर: दादरहून डहाणूकडे जाणारी लोकल दादर-विरार व विरार-डहाणू अशा दोन टप्प्यांत धावत असल्याने प्रवाशांत गोंधळ निर्माण होत आहे. दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, भाईंदर व वसई स्थानकांवर डहाणू लोकल म्हणून उद्घोषणा होत नसून इंडिकेटरवरही विरार लोकलच दाखवली जात असल्याने प्रवाशांची दिशाभूल होत असल्याची तक्रार प्रवासी संघटनांनी केली आहे. त्यामुळे काही प्रवासी थेट डहाणूला जाणारी सेवा नसल्याच्या समजुतीतून प्रवासाला मुकत असल्याचेही सांगितले जात आहे.

    कशामुळे गोंधळ उडतो?

    पूर्वी दादर-डहाणू लोकल (क्रमांक ९३०२७) दादरहून सायंकाळी १६.४७ वाजता सुटून थेट डहाणू रोडपर्यंत धावत होती. मात्र १ नोव्हेंबर २०१८ पासून वेळापत्रकात बदल करून या सेवेचे दोन टप्पे करण्यात आले. दादर-विरार (९०७९१) आणि विरार-डहाणू (९३०३१) अशा स्वतंत्र गाड्या चालवण्यात येऊ लागल्या. नंतर प्रवाशांच्या मागणीनुसार सेवा पुन्हा जोडण्यात आली असली, तरी अद्याप ती दोन वेगवेगळ्या क्रमांकांनीच चालवली जात आहे.Maharashtra TimesMumbai Underground Tunnel: गिरगाव चौपाटीपर्यंत बोगद्याचा विस्तार होणार! ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह’ भुयारी मार्गाचा नवा प्लॅन मंजूर; 5 मिनिटांत प्रवास

    सध्या दादर स्थानकावर या गाडीची डहाणू लोकल म्हणून उद्घोषणा होत नसल्याने गोंधळ वाढत आहे. विरार स्थानकातही उतरणारे आणि पुढे जाणारे प्रवासी एकाच वेळी हालचाल करत असल्याने गर्दीची परिस्थिती निर्माण होते. महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

    15 डब्यांच्या लोकलची मागणी

    या पार्श्वभूमीवर दादर-डहाणू लोकल एकाच टप्प्यात जाहीर करावी, सर्व स्थानकांवर इंडिकेटर व उद्घोषणेत ‘डहाणू’ असा स्पष्ट उल्लेख करावा, तसेच गर्दी लक्षात घेऊन १५ डब्यांची गाडी चालवावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

    यापूर्वी विरार-संज्जाण आणि संज्जाण-सुरत मेमू सेवा एकत्र करून थेट विरार-सुरत सेवा सुरू करण्यात आली होती. त्याच धर्तीवर दादर-डहाणू लोकलही एकसंध करण्यात यावी, अशी मागणी डहाणू वैतरणा प्रवासी संघटनेचे सचिव दयानंद पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे लेखी स्वरूपात केली आहे.

    Maharashtra TimesThane News: रस्त्याच्या मधोमध स्थानकं, 3000 झाडांची कत्तल! ठाणे रिंग मेट्रोमुळे कोंडी कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती

    मुलामा १६४ कोटींचा!

    मुंबईतील पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील उड्डाणपुलांवरील खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधींच्या डांबरीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर आता याच दोन महामार्गांवरील निवडक पट्ट्यांवर ‘मायक्रो सर्फेसिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. डांबर, खडी आणि द्रव पदार्थांच्या मिश्रणातून दिला जाणारा हा तात्पुरता मुलामा रस्त्यांचे आयुर्मान वाढवण्यासाठी उपयोगी ठरेल, असा मुंबई महापालिका प्रशासनाचा दावा आहे. गेल्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने या तंत्रज्ञानाचा वापर महामार्गांवर करण्यात आला आहे. या तात्पुरत्या मुलाम्यासाठी तब्बल १६४ कोटी ९४ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा