• Tue. Sep 8th, 2026
महाराष्ट्रातील लाइव्ह बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एका क्लिकवर


Live News Marathi: विधानसभा निवडणुकीत भाजपकडून धक्कादायक पराभवाची चव चाखावी लागलेल्या पश्चिम बंगालच्या मावळत्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा न देण्याचा पवित्रा मंगळवारी घेतला. हा निवडणूक निकाल खऱ्या अर्थाने जनादेश नसून एका कटाचा परिणाम असल्याचा आरोप करीत त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर आगपाखडही केली. राज्यात उष्म्याचा तडाखा वाढता असून, एक मार्च ते तीन मे या कालावधीत राज्यात उष्माघाताचा त्रास झालेल्या १६३ रुग्णांची नोंद झाली आहे, तर तीन जणांचा मृत्यू हा उष्माघातामुळे झाल्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाकडून वैद्यकीय विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे मृत्यू नेमके कोणत्या कारणांमुळे झाले याबाबत निश्चितपणे सांगता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed