• Sat. Sep 5th, 2026
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज पाहा एका क्लिकवर


Maharashtra Live News: अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने अक्षरश: इतिहास घडवला. भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा त्यांचे गृहक्षेत्र असलेल्या भवानीपूर मतदारसंघात पराभव केला. पाच वर्षांपूर्वीच्या नंदीग्राममधील राजकीय नाट्याची पुनरावृत्ती करणाऱ्या या उच्चस्तरीय लढतीत तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. या विजयामुळे सुवेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्रिपदावरील दावेदारी अधिक मजबूत झाली आहे. दरम्यान, महामुंबई परिसरातील पारा पुन्हा चढू लागण्याचा अंदाज आहे. बुधवार ६ मेपासून मुंबई, ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्येही उष्ण आणि दमट वातावरणासाठी ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed