Pune Pawana Dam Three Youth Drowns : उन्हाळ्याची सुट्टी आणि रविवारचा विकेंड एन्जॉय करण्यासाठी मावळ परिसरात आलेल्या पुण्याच्या तीन तरुणांचा पवना नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय.
पवना धरणात तीन तरुणांचा बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : उन्हाळ्याच्या सुट्टीचा आणि विकेंडचा आनंद घ्यायला मावळ परिसरात आलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मावळ तालुक्यातील थूगाव परिसरातील पवना नदी पात्रात घडली. मृतांमध्ये प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव आणि आयान शेख यांचा समावेश आहे. आज रविवारची सुट्टी असल्याने हे तिघेही पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. वाढत्या उकाड्यामुळे त्यांनी नदीत पोहण्याचा निर्णय घेतला, मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले.
घटनेमुळे परिसरात हळहळ
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि शिवदुर्ग मित्र मंडळाच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर तिन्ही तरुणांचे पार्थिव बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी नदी-नाल्यात पोहताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. Solapur Crime : वराह पालनाचा वाद विकोपाला, 6 जणांनी दिवसाढवळ्या भर चौकात तरुणाला निर्घृणपणे संपवलं, सोलापूरात दहशत
मावळमध्ये मृत्यूंची मालिका; दोन दिवसांत सात जणांचा बळी
गेल्या दोन दिवसांत मावळ परिसरात एकूण सात जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांनी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. पवना धरणासह इतर धरण परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली असताना अशा दुर्घटना सातत्याने घडत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि विकेंडचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या भागात दाखल होत आहेत. मात्र, पाण्याचा अचूक अंदाज न येणे, खोल पाण्यात उतरणे, तसेच सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे हे जीवघेणे ठरत आहे.प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही काही पर्यटक निष्काळजीपणा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पवना धरण किंवा इतर जलाशयांमध्ये पोहताना आणि पाण्यात उतरताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. Mumbai-Pune Missing Link : मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर सेल्फी अन् फोटो काढण्यास मज्जाव, अन्यथा महागात पडणार; पोलिसांकडून मोठी कारवाई
दोन दिवसांत सहा जणांचा बुडून मृत्यू
मावळ तालुक्यात दोन दिवसांत सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटना तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असून, कामगार दिनी तीन कामगारांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जाधववाडी येथे सेल्फी काढण्याच्या नादात तिघे मित्र बुडाले. अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष येडके (तिघेही रा. भोसरी) अशी त्यांची नावे आहेत. वलवण धरणात योगेश पालवे (वय 30, रा. कुरवंडे, लोणावळा), यश कुलदीप धनोरिया (वय 13, रा. लोणावळा) यांचा मृत्यू झाला. मनोज भारत गौतम (वय 25, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे पवन मावळातील साळुंब्रे गावच्या हद्दीत पवना नदी पात्रात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा