Latur Crime News : पुण्यानंतर आता लातूर जिल्ह्यातही संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जळकोट मतिमंद मुलीवर बापाकडून अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर या गावामध्ये चार वर्षाच्या चिमूरडीसोबत झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात जन्मदात्या बापाकडूनच गतीमंद मुलीवर जबरदस्ती केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे लातूर जिल्ह्यात देखील संतापाची लाट पसरली आहे.
नेमकी घटना काय?
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून धक्कादायक आणि संतापजनक घटनांची मालिका सुरू असून नसरापूर आणि बीडनंतर आता लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातून अत्यंत अमानवी प्रकार उघडकीस आला आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन गतीमंद मुलीवर वारंवार जबरदस्ती केल्याची घटना समोर आल्यानं परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने 17 एप्रिल रोजी जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अज्ञात व्यक्तीकडून मुलीवर जबरदस्ती झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, पीडित मुलगी सुमारे 19 आठवडे 2 दिवसांची गर्भवती असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले. Nasrapur Girl Death : 15 वर्षाआधीही विकृत कृत्य, त्याच्याच लोकांनी त्याला हाकललेले, परत गावात एन्ट्री नाही; नसरापुरातील नराधमाची कुंडली
तपासामध्ये धक्कादायक सत्य समोर
तक्रारीनंतर जळकोट पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयाच्या आधारे मुलीच्या वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसी चौकशीत संबंधित आरोपी वडिलानेच हे कृत्य केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 99/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमे तसेच बाल लैंगिक जबरदस्ती प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत. TCS Company Case : आधी थंड पेय अन् शिरखुर्मातून गुंगीचं औषध दिलं, नंतर पीडितांसोबत संतापजनक कृत्य; नाशिक TCS प्रकरणात SITच्या हाती मोठे पुरावे
नसरापुरातील नराधमाची कुंडली
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात नराधमानं चिमुकलीवर जबरदस्ती करून तिला संपवलं असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेचे राजकीय पडसादही उमटत असून कायदा आणि सुव्यस्थेचा बोजवारा उडालेला आहे, असा आरोप केला जातोय. तसेच आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, एकीकडे या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात असताना याच प्रकरणातील आरोपीच्या किळसवाण्या प्रवृत्तीची पुन्हा एक संतापजनक माहिती समोर आली आहे. त्याला गावातून 15 ते 20 वर्षांपूर्वीच हाकलून देण्यात आलं होतं. सोबतच त्याने याआधी कोंबड्या आणि शेळ्यांवरही अत्याचार केल्याचं त्याच्या गावातील लोकांनी सांगितलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा