• Sat. Jun 6th, 2026
    Pune Nasrapur Crime: नसरापूरमधील पीडित मुलीचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट पोलिसांच्या हाती; संपूर्ण प्रक्रिया ‘इन कॅमेरा’, तपासाला वेग

    Nasrapur Girl Case: शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

    नसरापूरमधील पीडित मुलीचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट पोलिसांच्या हाती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: अवघ्या साडेतीन वर्षांच्या एका चिमुकलीवर ६५ वर्षांच्या सराईताने अत्याचार करून दगडाने ठेचून खून केल्याची अत्यंत घृणास्पद घटना नसरापूर येथे शुक्रवारी उशिराने उघडकीस आली. या घटनेनंतर नसरापूर परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला ताब्यात द्या; अन्यथा एन्काउंटर करा, हीच मागणी नसरापूर परिसरातून केली जात आहे. या प्रकरणात राजगड पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करून आरोपी भीमराव कांबळे (वय ६५, रा. भोर) याला अटक केली असून, आरोपी बिगारी कामगार आहे. त्याला शिवाजीनगर येथील पुणे न्यायालयाने सात मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या नराधमाने या चिमुकलीचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात पालापाचोळ्याखाली लपवला होता.

    पीडित मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शनिवारी सायंकाळी ससून रुग्णालयात करण्यात आले. न्यायवैद्यक विभागात ही प्रक्रिया गोपनीय पद्धतीने पार पडली; तसेच ही संपूर्ण प्रक्रिया ‘इन कॅमेरा’ करण्यात आली. प्राथमिक अहवाल पोलिसांकडे देण्यात आला आहे. मृतदेह शनिवारी रुग्णालयात आणण्यात आला होता. या वेळी रुग्णालय परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

    पंचनामा झाल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अंतर्गत अवयवांचे नमुने तपासणीसाठी ठेवण्यात आले असून, ते पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती रुग्‍णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. येल्‍लपा जाधव यांनी सांगितले.

    दरम्यान, नराधमाच्या अनन्वित अत्याचारात जीव गमावलेल्या चिमुकलीचे शव सायंकाळी साडेचारच्या सुमारास धायरी परिसरातील तिच्या घरी आणण्यात आले. अमानवी कृत्याच्या निषेधार्थ परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने गोळा झाले. ‘नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’, ‘न्याय मिळालाच पाहिजे,’ ‘आश्वासन नको, कारवाई हवी,’ ‘प्रशासन जागे व्हा’ अशा घोषणा जमावाने दिल्या. परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्याला फाशीची शिक्षा द्या, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. सायंकाळी पश्चिम बाह्यवळण मार्गावरही आंदोलकांनी ‘रास्ता रोको’ केले. वीर बाजी पासलकर पूल आणि नवले पुलादरम्यान एका हॉटेलसमोर आंदोलन करण्यात आले. चिमुकलीचा मृतदेह असलेल्या रुग्णवाहिकेसमोरच तिचे आई-वडील व नातेवाइकांच्या उपस्थितीत जमावाने ठिय्या दिला. घोषणांनी परिसर दणाणून गेला. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना हटवले. त्यानंतर बालिकेचा मृतदेह वैकुंठ स्मशानभूमीकडे नेण्यात आला.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा